Congress On Vinod Tawde : '...म्हणून तावडेंना तत्काळ अटक करा!'; काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्याची पैसे वाटप प्रकरणात अखेर 'एन्ट्री'

BJP Leader Vinod Tawde Money Bag Case : काँग्रेसकडून सोशल मीडियावर विनोद तावडे आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. याच व्हिडिओवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तावडे पैसे वाटपप्रकरणी सवाल केले आहेत.
Vinod Tawde
Vinod TawdeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्रात एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदान प्रक्रिया अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे.त्यातच मंगळवारी(ता.19) विरारमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. हॉटेल विवांतामध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, महायुतीचे उमेदवार राजन नाईक यांच्याकडून पैशाचं वाटप करण्यात येत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राजकीय वातावरण तापवलं. या प्रकरणामुळे भाजपसह महायुती विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशातच आता काँग्रेसच्या बड्या नेत्यानं या प्रकरणात एन्ट्री घेत थेट तावडेंच्या अटकेचीच मागणी केली आहे.

संसदेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी यांनी विरार पैसे वाटप प्रकरणावरुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच खडा सवाल विचारला आहे.याचदरम्यान,आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी विरारमधील पैसे वाटपावरुन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

चेन्निथला म्हणाले,विनोद तावडे यांनी जे काम केलं, त्यासाठी त्यांना तत्काळ अटक करण्यात आली पाहिजे. त्यांच्यावर खटला दाखल करायला हवा.ज्यांनी पैसे वाटले आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. संपूर्ण राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पैसे वाटले जात आहेत. त्याची चौकशी केली जावी,अशी मागणी चेन्निथला यांनी केली आहे.

Vinod Tawde
Anil Deshmukh : 'तुम्ही दगड मारा नाहीतर गोळ्या झाडा अनिल देशमुख मरणार नाही आणि..' ; भाजपला इशारा !

याचवेळी त्यांनी महाराष्ट्रात भाजपनं पराभव मान्य केला आहे. यामुळं त्यांनी पैसे वाटप करणं सुरु असल्याचा आरोपही काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांनी केला आहे.ते म्हणाले, भाजप पक्षाचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे 5 कोटी रुपये एका मतदारसंघात जाऊन पैसे वाटणं याचं उदाहरण आहे.कितीही पैसे वाटले तरी भाजप महायुती राज्यात विजय मिळवू शकणार नाही.महाराष्ट्राची जनता सत्तापरिवर्तन करणार असल्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.

राहुल गांधी मोदींना काय म्हणाले..?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विनोद तावडे पैसे वाटप प्रकरणावरुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच निशाणा साधला आहे. काँग्रेसकडून सोशल मीडियावर विनोद तावडे आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

याच व्हिडिओवरुन गांधी यांनी तावडे पैसे वाटप प्रकरणी सवाल केले आहेत. ते म्हणाले, नरेंद्र मोदीजी हे पाच कोटी कुणाच्या सेफमधून निघाले आहेत.जनतेचे पैसे लुटून कुणाला टेम्पो पाठवला होता असेही राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Vinod Tawde
Uddhav Thackeray : तावडे पैसे वाटप प्रकरणानं संधी दिली; त्याक्षणी ठाकरेंनी फडणवीस अन् भाजपचा हिशोब चुकता केला!

तावडेंचं राहुल गांधींना प्रत्युत्तर

विनोद तावडे प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'एक्स' अकाउंटवर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट प्रश्न विचारला आहे. 'हे पाच कोटी रुपये कोणाच्या SAFE मधून आले आणि जनतेचा पैसा कोणी लुटला,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जनतेचे पैसे लुटून कुणाला टेम्पो पाठवला होता, असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.

त्यावर राहुल गांधींच्या टीकेला तावडेंकडून आव्हान दिले आहे. 'राहुल गांधीजी तुम्ही स्वतः नालासोपारा येथे या, हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज बघा, तेथील निवडणूक आयोगाची संपूर्ण कार्यवाही बघा आणि पैसे कसे आले हे सिद्ध करा." कोणतीही माहिती नसताना अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे पोरकटपणाचं लक्षणं असंही विनोद तावडे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com