Mumbai Market Committee Election Sarkarnama
विशेष

राष्ट्रवादीकडील मुंबई बाजार समिती ताब्यात घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा डाव भाजपने उधळला; फडणवीसांनी सूत्रे हलवली?

मुंबई बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीला स्थगिती; मुख्यमंत्री समर्थक तोंडघशी

गणेश कोरे

पुणे : ग्रामीण राजकारणाशी निगडीत सर्वांत मोेठे आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या आणि अशिया खंडातील सर्वात मोठ्या मुंबई (mumbai) बाजार समितीवर (Bazar Samiti) सत्ता काबीज करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मनसुब्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) गटातील साताऱ्याच्या आमदाराच्या माध्यमातून भाजपाने सुरूंग लावला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) ताब्यातून आर्थिक सत्ता केंद्र हिसकावून घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकि राजवट आणण्याचे भाजपाचे डावपेच सुरू आहेत. (Postponement of Election of Chairman, Deputy Chairman of Mumbai Market Committee)

मुंबई बाजार समितीच्या सात संचालकांच्या तात्रिक मुद्द्यांवर माजी पणन संचालक सुनील पवार यांना अपात्र केले होते. या अपात्रतेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीचे विद्यमान सभापती अशोक डक आणि काँग्रेसचे उपसभापती धनंजय वाडकर यांनी अडीच वर्षांचा कार्यकाल संपल्याचे कारण देत राजीनामा दिला. त्यानंतर नवीन सभापती निवडीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रभू पाटील आणि शिवसेनेचे खासदार (शिंदे गट) प्रताप जाधव यांचे बंधू माधवराव जाधव यांच्यात सभापतीपदी पदासाठी स्पर्धा सुरू झाली होती.

सभापतीपदाची निवडणुक गुरुवारी (ता. १२ जानेवारी ) जाहिर करण्यात आली होती. मात्र बुधवारी (ता.११ जानेवारी) मंत्रालयातून सूत्रे हलली आणि जिल्हा उपनिबंधक किरण सोनवणे यांनी मुंबई बाजार समितीची निवडणुक संचालकांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय प्रलंबित असल्याचे कारण देत निवडणूक प्रक्रियेला स्थगिताचे आदेश काढल्याने प्रभू पाटील आणि माधवराव जाधव यांच्या उत्साहावर पाणी पडले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील सर्वांत मोठ्या बाजार समितीवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचे मुख्यमंत्री शिंदे गटाचे मनसुबे भाजपच्या डावपेचामुळे धुळीस मिळाले आहेत.

साताऱ्यातील आमदाराचा फडणवीसांकडे हट्ट

मुंबई बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा हट्ट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सातारा येथील कट्टर समर्थक आमदारांनी केल्याचे समजते. आम्ही मंत्रीपद मागत नाही, किमान मुंबई बाजार समिती तरी द्या, असा हट्ट त्या आमदारांचा आहे. काहीही करून बाजार समिती बरखास्त करा, असा हट्ट त्या आमदारांनी केल्याची खात्रीलायक माहिती आहे.

कायदेशीर अडचण; निवडणुकीला स्थगिती

पणन संचालकांनी सात संचालकांना कायद्यातील तरतुदींचा आधार घेत अपात्र केले होते. या अपात्रतेवर पणन मंत्र्यांचा पदभार असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियमबाह्य स्थगिती दिली होती. नेमक्या याच मुद्द्यावर सभापती-उपसभापतींची निवड कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची भीती निर्माण झाल्यावर निवडणुकीला स्थगिती दिल्याचे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT