Mumbai, 02 December : महायुती सरकारच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा येत्या पाच तारखेला पंतपप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा होणार आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गावी दरे येथे आल्याने महायुतीच्या बैठका थंडावल्या होत्या. मात्र, शिंदे हे रविवारी मुंबईत दाखल झाले आहेत, त्यामुळे सत्तास्थापनेला वेग येईल, असे वाटत असतानाच राज्याच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट आला आहे. अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी दिल्लीला निघाले आहेत. ते आज (ता. 02 डिसेंबर) दुपारी दिल्लीला रवाना होणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत देऊनही भाजप आणि मित्रपक्षांना अद्याप सरकार स्थापन करता आलेले नाही. मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरून माघार घेताना गृहमंत्रिपदावर दावा केला, त्यामुळे महायुतीमध्ये पुन्हा एकदा खेचाखेची सुरू झाली आहे.
मुख्यमंत्रिपद नाकारल्यानंतर नाराज झालेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सातारा जिल्ह्यातील दरे या मूळगावी दोन ते तीन दिवस मुक्कामी आले होते, त्यामुळे महायुतीच्या सर्व बैठका रद्द झाल्या होत्या. मंत्रिपद वाटप आणि इतर गोष्टींसाठी होणाऱ्या बैठकांही होऊ शकल्या नव्हत्या. रविवारी शिंदे हे ठाण्यात दाखल झाले, त्यामुळे महायुतीमधील वाद मिटून येत्या पाच तारखेला शपथविधीचा सोहळा सुरळीतपणे होईल, असे वाटत होते.
महायुतीच्या मुख्यमंत्र्यांचा येत्या पाच डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानात शपथविधी होईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार (Ajit Pawar) हे आज अचानकपणे दिल्लीकडे निघाले आहेत. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतील, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीत मंत्रिमंडळासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. ज्या आमदारांना मंत्री करायचे आहे, त्या आमदारांचे रिपोर्ट कार्ड सादर करण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी महायुतीचे तीनही नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवा यांना करण्यात आली होती. या दौऱ्यात अजित पवार आपल्या पक्षातील संभाव्य मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड अमित शहा यांना सादर करण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.