Uddhav Thackeray and Eknath Shinde : 'जसं उद्धव ठाकरे सोबत झालं तेच एकनाथ शिंदे सोबतही....' ; सत्ता स्थापनेवरून माजी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य!

Maharashtra Political News : देशाच्या घटनेचा आत्मा हा लोकशाही आहे आणि या लोकशाहीचा मुडदा सध्याच्या सरकारने पाडला आहे, असा आरोप जाणून घ्या असा आरोप नेमकं कोणत्या माजी मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे.
eknath Shinde and Uddhav Thackary
eknath Shinde and Uddhav ThackarySarkarnama
Published on
Updated on

Prithviraj Chauhan in Pune : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळलं असताना देखील सत्ता स्थापनेला उशीर लागला असल्याचं बोललं जात आहे. महायुतीतील मित्र पक्षांमध्ये सत्तेतील वाट्यावरून रस्सीखेच सुरू असल्याने हा उशीर झाला असल्याचा आरोप सातत्याने विरोधातून कडून करण्यात येत आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढण्याने तेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते असं मत काही विरोधी पक्षातील नेते व्यक्त करताना दिसत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या बाबत भाष्य केला आहे.

पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना पृथ्वीराज चव्हाण(Prithviraj Chavan) म्हणाले, देशाच्या घटनेचा आत्मा हा लोकशाही आहे आणि या लोकशाहीचा मुडदा सध्याच्या सरकारने पाडला आहे. पैशाचा वापर, सत्तेचा दुरुपयोग करून लोकशाही नष्ट केली तर घटनेलाही अर्थ राहणार नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर करण्यात आला.

सत्तेचा गैरवापर करून पोलिसांच्या गाड्यांमध्ये पैसे पोहचवण्यात आले. कायदे बदलून एकतर्फी निर्णय घेऊन निवडणूक आयुक्त तुम्ही बसवणार असाल आणि त्यांच्याकडून तुमच्या मर्जीप्रमाणे काम करून घेणार असाल तर त्याचा आम्ही तीव्र निषेध करणार असून एक जनआंदोलन या विरोधात उभारणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

eknath Shinde and Uddhav Thackary
Ravindra Chavan : मुख्यमंत्रि‍पदासाठी नाव चर्चेत, रवींद्र चव्हाणांनी स्पष्टच सांगितले, 'गेल्या 2-3 दिवसांपासून...'

विधानसभा निवडणुकीमध्ये(Vidhansabha Election) अनेक विधानसभा मतदारसंघात वेगवेगळ्या गोष्टी घडल्या असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जर निवडणूकिमध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हीएम वर लोकांचा विश्वास नसेल तर निवडणूक आयोगाची प्राथमिक जबाबदारी आहे की निवडणूक प्रक्रिया बदलली गेली पाहिजे. ज्या प्रक्रियेवर लोकांचा विश्वास आहे ती प्रक्रिया अमलात आणून निवडणुका घेणे आवश्यक आहे.

ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये निकाल लागले ते होणं शक्यच नाही असं अनेक विश्लेषक सांगत आहेत. त्यामुळे इकडची मतं तिकडे गेली असण्याची मोठी शक्यता आहे. आता सुप्रीम कोर्टाच्या(Supreme Court) आदेशानुसार फक्त पाच टक्के व्हीव्हीपॅट मोजण्याचे परवानगी देण्यात आली आहे. मात्र यातून काहीच साध्य होणार नाही. जोपर्यंत शंभर टक्के व्हीव्हीपॅट मोजले जात नाहीत, तोपर्यंत या निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येणार नाही असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

eknath Shinde and Uddhav Thackary
Abdul Sattar News : जुनी प्रकरणं नव्याने समोर ; अब्दुल सत्तारांचा पाय खोलात!

विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमत मिळून देखील अद्याप सरकार अस्तित्वात आलेलं नाही त्याबाबत बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सध्या महायुतीतील मित्र पक्षांमध्ये अंतर्गत विरोध असल्याचं दिसत आहे. ज्या पद्धतीने भाजपच्या केंद्रातील नेतृत्वाने 2019 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फसवलं त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे यांना देखील फसवलं आहे. ही निवडणूक एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात झाली असल्याने त्यांनी फसू नयेत अशी अपेक्षा होती मात्र आता ते झालं आहे. अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

भाजपा नेते अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांनी माझ्या नेतृत्वात काँग्रेसला शंभर पेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात त्या पन्नास वरती आल्या आणि आता त्या वीस वरती पोहोचले असल्याची टीका त्यांनी केली होती. त्याला उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले माझ्या काळात जागा कमी झाल्या कारण त्यावेळेस मोदींची लाट होती. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या गेल्यास त्यावेळी कमी जागा मिळाल्या अपेक्षाही कमी जागा आम्हाला मिळाल्या आहेत, त्याही लोकसभा निवडणुकीमध्ये एवढा मोठा प्रमाणात महाराष्ट्रात जागा जिंकल्यानंतर ही शंका उपस्थित होणारी गोष्ट असल्याचा पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com