Uddhav Thackeray & Vinod Tavde Sarkarnama
विशेष

Vinod Tawde : विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळणार का ? विनोद तावडेंचा मोठा दावा

Political News : प्रचारासाठी अवघ्या काही दिवसाचा अवधी शिल्लक असल्याने कोण बाजी मारणार याची उत्सुकता लागली असतानाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत विनोद तावडेंनी मोठं विधान केले आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात रंगतदार अवस्थेत आला आहे. निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीने मोठी ताकद लावल्याने चुरस वाढली आहे. त्यातच सत्तधारी व विरोधी पक्षाकडून एकमेकांवर केल्या जात असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. प्रचारासाठी अवघ्या काही दिवसाचा अवधी शिल्लक असल्याने कोण बाजी मारणार याची उत्सुकता लागली असतानाच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळणार का ? याबाबत विनोद तावडेंनी मोठा दावा केला आहे.

विधानसभा निवडणुकीला आता हातावर मोजण्याइतके दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्याचवेळी भाजप (Bjp) नेते विनोद तावडे यांनी एका वृतवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्यातील मुख्यमंत्री पदाबाबत मोठं विधान केले आहे. महाराष्ट्राच्या हिताचे पाहूनच निवडणूक निकालानंतर सीएम पदाबाबत निर्णय घ्यावा लागेल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

राज्यात येत्या काळात महायुतीची सत्ता आली तर कोण मुख्यमंत्री होणार? या प्रश्नावर बोलताना विनोद तावडे (VInod Tawde) म्हणाले, 'मुख्यमंत्रिपदाची चर्चा निवडणुकीनंतर करू, असे महायुतीमधील घटक पक्षाने ठरवले आहे. संख्याबळावर मुख्यमंत्री ठरणार नाही. निवडणुकीनंतर सर्व पक्ष एकत्र बसवून ठरवू. ज्याचे आमदार जास्त तो होईल किंवा बिहारमध्ये आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले. आमचे आमदार जास्त होते तरी पण नितीश कुमार मुख्यमंत्री झाले. पण त्या त्यावेळच्या राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन, हे करावे लागणार आहे.'

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळाली असे म्हटले जात असले तरी लोकसभा निवडणुकीत ठाकरे यांना सहानुभूती मिळाली असे म्हणने चूक असल्याचे विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर गद्दारी केली हे लोकांच्या मनात पक्कं असल्याने पुन्हा मतदार त्यांच्या पाठीशी उभे राहतील, असे वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले.

त्यासोबतच या निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल. भाजपला 95 ते 110 जागा मिळतील. शिवसेना शिंदे गट 45 ते 55 जागा जिंकेल तर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट 25 ते 30 जागा जिंकेल. त्यामुळे महायुतीमधील तीन पक्ष मिळून महायुतीच्या 165 ते 170 पर्यंत जागा निवडून येतील, असा अंदाजही यावेळी विनोद तावडे यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT