Santosh Deshmukh-Dhananjay Munde-Ajit Pawar Sarkarnama
विशेष

Ajitdada on Munde Resign : धनंजय मुंडेंनी राजीनामा देण्याअगोदर ‘देवगिरी’वरील बैठकीत काय घडलं...कोण, कोण उपस्थित होतं?; खुद्द अजितदादांनी केला उलगडा

Santosh Deshmukh Murder Case : मी, धनंजय मुंडे, चंद्रेशखर बावनकुळे, सुनील तटकरे आणि देवेंद्र फडणवीस असं आम्ही पाच जण देवगिरी बंगल्यावर बसलो होतो. खरं तर मीडियाला कळलंही नाही की आम्ही ‘देवगिरी’वर कधी बसलो. सगळे जण इकडे तिकडे कॅमेरे लावून बसले होते.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 22 March : संतोष देशमुख खूनप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, तो निर्णय कोणी आणि कोणाच्या उपस्थितीत कुठे झाला, याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात दिली. धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याच्या अगोदर देवगिरी बंगल्यावरील बैठकीत काय झालं, त्या ठिकाणी कोण कोण उपस्थित होतं, याचा उलगडा खुद्द अजितदादांनी केला आहे.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मागे माझ्यावर एकदा आरोप झाले होते, त्यावेळी ते आरोप असाहाय्य झाल्याने मी राजीनामा दिला होता. म्हटलं एकदा काय ती श्वेतपत्रिका काढा आणि दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाऊ द्या, अशी भूमिका मी घेतली होती. संतोष देशमुख खूनप्रकरणी एसआयटी, सीआयडी आणि न्यायालयीन अशी तीन स्तरावर चौकशी करण्यात येत आहे.

जोपर्यंत न्यायालयीन चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्हाला त्याबाबत विचारपूस करता येत नाही. पण, एसआयटी आणि सीआयडीला ‘एखाद्या प्रकरणात कोण कोण आलं आहे,’ याची विचारपूस करता येते. देशमुख खूनप्रकरणातील चौकशीत धनंजय मुंडेंपर्यंत (Dhananjay Munde) जाणारा एकही धागा अजूनपर्यंत सापडलेला नाही. पण ज्यावेळी काही फोटो व्हायरल झाले, त्यावेळी काहींनी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांना आताच फोटो दिसले का?, असा आरोप केला. तसं आम्हाला करता येत नाही. चौकशी नीट सुरू आहे ना?, राजकीय हस्तक्षेप आहे का?, तुम्ही कोणाच्या दबावाला घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही पारदर्शक चौकशी करा, एवढंच आम्ही सांगणार ना.? असेही अजित पवार यांनी नमूद केले.

अजित पवार म्हणाले, संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे जे फोटो बाहेर आले, ते पाहून आम्हालाही वेदना झाल्या, आम्हीही माणूसच आहोत. त्यातून धनंजय मुंडे यांनी निर्णय घेतला. मी, धनंजय मुंडे, चंद्रेशखर बावनकुळे, सुनील तटकरे आणि देवेंद्र फडणवीस असं आम्ही पाच जण देवगिरी बंगल्यावर बसलो होतो. खरं तर मीडियाला कळलंही नाही की आम्ही ‘देवगिरी’वर कधी बसलो. सगळे जण इकडे तिकडे कॅमेरे लावून बसले होते.

देवगिरीवर आमची बैठक झाली. त्यात चर्चा झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. तो मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून मंजुरीसाठी राज्यपालाकडे पाठविण्यात आला आणि आम्ही पुढे गेलो, असेही अजितदादांनी स्पष्ट केले.

आता कुठलाही निर्णय घेतला, तर चर्चा करायची म्हटल्यावर राजीनामा आधी घेतला असता योग्य झालं असतं का? तर मंत्रिमंडळातच घेतले नसते तर योग्य ठरलं असतं का? पण प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या बाजू असता. जे झालं ते झालेले आहे, सर्वांच्या समोर आहे. मुंंडेंचा राजीनमा घेण्यात आलेला आहे. तीनही प्रकारची चौकशी होऊन वस्तुस्थिती पुढे आल्यानंतर त्याबद्दलचे निर्णय घेतले जातील. या प्रकरणात कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, असेही उपमुख्यमंत्री पुन्हा एकदा सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT