Ajit Pawar Sarkarnama
विश्लेषण

Ajit Pawar Warning : बीडमध्ये पाऊल ठेवताच अजितदादांकडून कानउघाडणी; गुन्हेगारी प्रवृत्ती, कृत्यांना थारा देणार नसल्याचा भरला दम

Ajit Pawar in Beed News : गेल्या दीड महिन्यापासून केज तालुक्यातील मस्सजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेत आला आहे, अशातच पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्याने अजित पवार यांनी त्यांच्या बीड जिल्ह्याच्या पहिल्याच दौऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे कान टोचले आहेत.

Sachin Waghmare

Beed News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी बीडचे पालकमंत्री या नात्याने गुरुवारी पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. बीडमध्ये पाऊल ठेवताच त्यांनी त्यांच्या पद्धतीने कामांचा धडका लावला. त्यांनी काही महत्वाची निर्णय घेतले. त्यासोबतच येत्या काळात बीड जिल्ह्याला शिस्त लावण्यासाठी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत कानउघाडणी केली.

यावेळी त्यांनी गुन्हेगारी प्रवृत्ती, कृत्यांना थारा देणार नसल्याचे सांगत येत्या काळात कोणी खंडणी मागितली तर मकोका लावणार असल्याचा इशारा दिला. गेल्या दीड महिन्यापासून केज तालुक्यातील मस्सजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेत आला आहे, अशातच पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्याने अजित पवार यांनी त्यांच्या बीड जिल्ह्याच्या पहिल्याच दौऱ्यात राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांचे कान टोचले आहेत.

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्हा नियोजन समितीची गुरुवारी पहिलीच बैठक पार पडली. बीडमध्ये दाखल झाल्यानंतर अजित पवार यांनी प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गेल्या दीड महिन्यापासून बीड जिल्हा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. त्यावर बोलताना अजितदादांनी काही खडे बोल सुनावले.

बीडच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या सध्या वाचतो व पाहतो. त्यामध्ये ज्याठिकाणी तथ्य असेल तिथे संबंधितावर कारवाई केली जाईल. जिथे तथ्य नसेल त्या संदर्भात कारवाई करण्याचा प्रश्न येणार नाही. याठिकाणी जिल्हाध्यक्ष आहेत सर्व विभागाचे प्रमुख आहेत. माझी कामाची पद्धत थोडी वेगळी आहे. जी कामे मंजूर झाले आहेत, ती कामे दर्जेदार झाली पाहिजेत. त्यामध्ये वेडेवाकडे प्रकार झाले तर मी सहन करणार नाही. त्यावेळी तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळचा आहे की लांबचा आहे हेही बघणार नाही. जनतेचा पैसा सत्कारनी लागला पाहिजे, कुठेही गडबड नको आहे. मला सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे.

बीड जिल्ह्याच्या विकास कामांमध्ये कोणी आडवे येऊ नका. विकासाचे कामे करताना कोणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न करू नये, असे प्रकार माझ्या कानावर आल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लावण्यास मी मागे पुढे बघणार नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी इशारा दिला आहे.

बरीच वर्षे झाली काही अधिकारी येथेच आहेत. त्यांनाही मी दुरुस्ती करणार आहे. कायम लक्षात ठेवा नियम सर्वांसाठी सर्वांसाठी सारखे आहेत. मला कोणालाही लक्ष्य करायचे नाही. मात्र बीडमध्ये बदल झाला पाहिजे. झालेला बदल हा मलाही जाणवला पाहिजे आणि इथल्या नागरिकांनाही जाणवला पाहिजे, असा इशारा त्यांनी यावेळी अधिकारी वर्गाला दिला. त्यामुळे या सर्वांचा परिणाम अधिकारी वर्गावर होणार आहे.

पहिल्याच बैठकीत अजित पवारांनी ऍक्शन मोडवर येत त्यांच्या कामाची चुणूक दाखवून दिली आहे. त्यांनी यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी, नेतेमंडळी, आमदार, अधिकारी यांच्या समोरच सर्वांचीच कानउघाडणी केली आहे. त्यामुळे आता येत्या काळात अजितदादांनी घेतलेल्या या बैठकीचा कितपत परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT