"BJP suffers a major setback in Bodoland elections as its decade-long winning streak is broken, marking a political challenge for Himanta Biswa Sarma." Sarkarnama
विश्लेषण

BJP Politics : भाजपचा 10 वर्षांचा विजयाचा रेकॉर्ड मोडला; आक्रमक मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का....

Bodoland Election Results 2025: BJP Faces Major Defeat : बोडोलँड फ्रंट हा केंद्रात एनडीएतीलच पक्ष आहे. त्यामुळे भाजपने हा एनडीएचा विजय असल्याचे म्हटले आहे. पण प्रत्यक्षात भाजपच्या जागा कमी झाल्याने पक्षाची डोकेदुखी वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Rajanand More

Impact on Himanta Biswa Sarma’s Political Strategy : भाजपची सत्ता असलेल्या आसाममध्ये नुकतीच मोठी घडामोड घडली. राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे भाजपचे आक्रमक नेते मानले जातात. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इतर विरोधी नेत्यांवर ते सतत सडकून टीका करतात. त्यांच्याविरोधात राज्यात काँग्रेसने आता रान उठवले आहे. त्यात सरमा यांना स्थानिक निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.

आसाममधील बोडोलँड प्रादेशिक परिषदेच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचा दहा वर्षांपासूनचा विजयाचा रेकॉर्ड या निवडणुकीच्या निकालाने मोडला आहे. पुढीलवर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हा निकाल चिंता वाढवणारा ठरला आहे. बोडोलँड पीपल्स फ्रंटने या निवडणुकीत कमाल केली आहे.

बोडोलँड फ्रंट हा केंद्रात एनडीएतीलच पक्ष आहे. त्यामुळे भाजपने हा एनडीएचा विजय असल्याचे म्हटले आहे. पण प्रत्यक्षात भाजपच्या जागा कमी झाल्याने पक्षाची डोकेदुखी वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. बीटीसीची निवडणूक म्हणजे विधानसभेची रंगीत तालीम मानली जाते. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी जोरदारपणे प्रचार केला होता.

सरमा यांच्या प्रचारानंतर भाजपला 40 पैकी केवळ पाच जागांवरच विजय मिळवता आला आहे. फ्रंटला तब्बल 28 जागा मिळाल्या आहेत. तर यूनायटेड पीपल्स पार्टी लिबरलला 7 जागांवर विजय मिळाला. या निकालानंतर सरमा यांनी आता सर्व 40 जागा एनडीएकडे असल्याची प्रतिक्रिया दिली होती. आघाडीमध्ये कोणताही बिघाड नसून आम्ही एकत्रितपणे काम करू, असेही ते म्हणाले होते.

सरमा यांची ही प्रतिक्रिया आगामी निवडणुकीतील जागावाटपावरून होणाऱ्या वादाबाबत सूचक संकेत देणारी मानली जात आहे. कारण परिषदेच्या मागील निवडणुकीत भाजपला नऊ तर यूपीपीएलला १२ जागा मिळाल्या होत्या. भाजपची ताकद घटली असून फ्रंटने कमाल करून दाखवली आहे. २०१६ पासून राज्याची विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला सातत्याने यश मिळत आले आहे.

बीटीसीच्या निवडणुकीत मात्र पक्षाला मतदारांनी झटका दिला आङे. मागील दहा वर्षांपासूनच्या पक्षाच्या विजयाला या निवडणुकीत रोखले आहे. हाग्रामा मोहिलरी यांच्या नेतृत्वाखाली बीपीएफने पहिल्यांदाच घवघवीत यश मिळवले आहे. मोहिलरी हे बोडोलँड लिबरेशन टायगर समुहाचे प्रमुख होते. 2003 मध्ये त्यांनी शस्त्र सोडून बोडो करारानंतर 2005 मध्ये बीटीसीची स्थापना केली.

पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवत ते परिषदेचे पहिले मुख्य कार्यकारी सदस्य बनले. 2005 ते 2020 अशी 15 वर्षे ते या पदावर होते. 2020 मध्ये त्यांच्या पक्षात फूट पडल्यानंतर त्यांनी परिषदेतील सत्ता गमवावी लागली होती. यावेळी त्यांनी पुन्हा एकहाती सत्ता काबीज केली. त्यांचा पक्ष एनडीएमध्ये असला तरी त्यांनी स्वतंत्रपणे ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT