Anil Deshmukh Attack Case : सलीम-जावेदच्या स्टोरीत ट्विस्ट; अनिल देशमुख यांच्यावरील हल्ल्याचे गुढ वाढले, फॉरेन्सिक रिपोर्ट देणार कलाटणी?

Forensic Report Raises New Questions in the Case : तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. सोबतच त्यांनी ही ‘सलीम-जावेदची स्टोरी‘ वाटते असे सांगून हल्ल्याच्या घटनेवर शंकाही व्यक्त केली होती.
Anil Deshmukh, Devendra Fadnavis
Anil Deshmukh, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Political controversy Maharashtra : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. ग्रामीण पोलिसांनी हल्ला हा केवळ बनाव असल्याचा अहवाल कोर्टात सादर केला आहे. त्यावर अनिल देशमुख यांनी या घटनेस राजकीय रंग देण्यात येत असल्याचा आरोप करून आपण फॉरेंसिक रिपोर्ट बघितल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या हल्ल्याचे गूढ आणखीच वाढले आहे.

काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघातील प्रचारादरम्यान अनिल देशमुख यांच्या चारचाकी गाडीवर रात्रीच्या सुमारास अचनाक दगडफेक झाली होती. त्यावेळी वाहनात अनिल देशमुख यांच्यासह चालक आणि मागच्या सिटवर आणखी एक जण बसले होते. हल्ल्यात एक मोठा दगड देशमुखांच्या गाडीची काच फोडून तो त्यांच्या कपाळावर आदळला होता. त्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने उपचार केल्यानंतर देशमुख यांना नागपूरमध्ये एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सुरुवातीपासूनच या हल्ल्यावर शंका व्यक्त केली जात होती. देशमुख हे माजी गृहमंत्री आहेत. त्यांना सुरक्षा देण्यात आली आहे. त्यांच्या वाहनासोबत सातत्याने एक पोलिसांची गाडी असते. फक्त देशमुख यांनाच कशी जखम झाली, असे प्रश्न त्यावेळी उपस्थित केले जात होते. देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली होती. मतदारांची सहानुभूती मिळावी यासाठी त्यांनी हा बनाव रचल्याचा आरोपही विरोधकांमार्फत केला जात होता.

Anil Deshmukh, Devendra Fadnavis
Anil Joshi News : राहुल गांधींची रणनीती, भाजपचे माजी मंत्री अनिल जोशी काँग्रेसच्या वाटेवर; कृषी कायद्यांना केला होता कडाडून विरोध...

तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. सोबतच त्यांनी ही ‘सलीम-जावेदची स्टोरी‘ वाटते असे सांगून हल्ल्याच्या घटनेवर शंकाही व्यक्त केली होती. हाच धागा पकडून सुरुवातीपासूनच या हल्ल्यास राजकीय रंग दिला जात असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

माझ्या गाडीवर दगडफेक झाली तेव्हा गाडी वळणावर होती. त्यामुळे वेग फार कमी होती. एक १० किलो वजनाचा दगड गाडीच्या काचेवर आढळला. काच फुटून तो माझ्या कपाळावर आदळळ्याने जखम झाली. दगड मारणारे दोन व्यक्ती होते. या घटनेची तक्रार आपण केली होती. मात्र सुरुवातीपासूनच भाजपचे नेते हा हल्ला राजकीय स्टंटबाजी असल्याचे सांगत आहेत. अद्यापही दगडफेक करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली नाही. हे पोलिसांचे अपयश आहे, असे देशमुख म्हणाले.

Anil Deshmukh, Devendra Fadnavis
Manorama Khedkar News : पोलिसांना मोठा झटका; मनोरमा खेडकर यांनी कोर्टाची पायरी चढत ‘सुरक्षा कवच’ही मिळवले...

कोर्टात समरी सादर करताना पोलिसांनी आरोपी सापडले नाहीत, याचा उल्लेख करणे आवश्यक होते. फॉरेंसिक रिपोर्टची वाट न बघताच राजकीय दबावापोटी पोलिसांनी कोर्टात अहवाल सादर केला आहे. मी राज्याचा गृहमंत्री होतो. काही गोष्टी मलाही कळतात. माझेही ओळखीचे काही लोक गृह खात्यात आहेत. मी फॉरेंसिक रिपोर्ट बघितला आहे. खरे खोटे काय ते उघड करू. कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com