Chandrashekhar Bawankule Sarkarnama
विश्लेषण

BJP Friendly Contest : 'जिथे जुळणार नाही, तिथे मैत्रीपूर्ण लढत', या बावनकुळेंच्या वक्तव्याने महायुतीमध्ये संभ्रम ?

Chandrashekhar Bawankule statement News: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'जिथे जुळणार नाही, तिथे मैत्रीपूर्ण लढत' असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे महायुतीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai Political News : सुप्रीम कोर्टाने चार महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता सर्वच पक्षाने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. महायुतीमध्ये निवडणूक एकत्रित लढविण्यावरून मतभेद असल्याचे पुढे आले आहे.

भाजपकडून स्वबळाची तयारी केली जात असताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढविण्याऐवजी मत विभागणी टाळण्यासाठी एकत्रित निवडणुका लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

त्यामुळे महायुती काय निर्णय घेणार? याकडे लक्ष लागले असतानाच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'जिथे जुळणार नाही, तिथे मैत्रीपूर्ण लढत' असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे महायुतीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्या त्यादृष्टीने महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षाकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. राज्यात गेल्या तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या.

गेल्या वर्षी लोकसभा व विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या. त्यामध्ये लोकसभेला महाविकास आघाडीला यश मिळाले तर विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवले. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याची उत्सुकता लागली आहे.

चार दिवसापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याचा दौरा केला. या दौऱ्यावेळी त्यांनी भाजपच्या (BJP) नेतेमंडळींच्या बैठका घेत आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चाचपणी केली आहे.

त्यानंतर मुंबई, पुणे व नाशिक महापालिकेत भाजपने स्वबळ अजमावण्याची तयारी करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केल्या असल्याचे समजते. भाजपच्या या स्वबळावर निवडणूक लढण्याच्या भूमिकेने मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणीत भर पडणार आहे.

त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार असल्याचे गुरुवारी त्यांनी स्पष्ट केले. महायुतीमधील मित्रपक्षाचे जिथे जुळणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत होईल, असे स्पष्ट करताना, ज्या ठिकाणी एकमेकाशी जुळणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत होतील, असे स्पष्ट केले आहे.

त्यामुळे बावनकुळे यांच्या विधानाचा अर्थ पहिला तर जिथे कार्यकर्त्यांचा खूपच आग्रह आहे, अशा मोजक्या ठिकाणी महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. तर त्या सोडून बाकी राज्यात एकत्रित निवडणूक लढवली जाणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना भूमिका स्पष्ट केली.

ज्या ठिकाणी महायुतीमधील मित्रपक्षाचे जुळणार नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल, त्यानंतर आम्ही पुन्हा एकत्र येऊ मात्र याचा अर्थ महायुतीमध्ये काही अडचण आहे असा होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

एकंदरीत महायुतीमधील हालचाली पहिल्या तर आगामी काळात होत असलेल्या महापालिका निवडणुका भाजप, शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. भाजपने मुंबईसह ठाण्याचा बालेकिल्ला सर करण्यासाठी रणनीती आखली आहे.

मुंबई पालिकेवर सातत्याने वर्चस्व गाजवणाऱ्या शिवसेनेत उभी फूट पडलयानंतर शिवसेना ठाकरे गटाची ताकद कमी झाली आहे. तर, दुसरीकडे भाजपची राजकीय ताकद चांगलीच वाढली आहे. त्यातच शिंदे गटाकडून मुंबई, ठाणे महापालिकेत मोठ्या प्रमाणात जागांची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीमध्ये येत्या काळात जागावाटपावरून चुरस पाहवयास मिळणार आहे.

आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्यास अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नकार दर्शवला आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र लढलो आहोत. त्याच प्रमाणे स्थानिकच्या निवडणुका एकत्रित लढल्यास महायुतीमधील मित्रपक्षांना फायदा होईल, त्यामुळे भाजपने एकत्रित लढावे, असे साकडे घातले आहे. त्यामुळे आता भाजप येत्या काळात काय निर्णय घेणार यावर बरेच काही अवलंबुन असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT