Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि बिहारमधील विधानसभेच्या निवडणुका पाहता काँग्रेसला दोन आघाडीवर संघर्ष करावा लागणार आहे. दोन्ही ठिकाणी होत असलेल्या निवडणुका पाहता काँग्रेसला वेगवेगळी भूमिका घेताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. विशेषतः मुंबई महापालिकेसह राज्यातील निवडणुका नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात होणार आहेत तर बिहारमधील निवडणुका डिसेंबर अखेरीस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही निवडणुकीसाठी काँग्रेसला वेगवेगळी भूमिका घ्यावी लागणार आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस (Congress) महाविकास आघाडीसोबत आहे. याठिकाणी लोकसभा व विधानसभा निवडणूका महाविकास आघाडीने एकत्रित लढल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढाव्यात असा सूर काही काँग्रेस नेत्याकडून काढला जात आहे. त्यामुळे चाचपणी करीत असलेल्या काँग्रेसच्या अडचणीत भरच पडली आहे.
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून भाजप विरोधी पक्षाने मोट बांधली आहे. त्याला मुंबईत पार पडलेल्या विजयी मेळाव्यात राज व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकत्रित येत मोठे सेलिब्रेशन साजरे केले आहे. त्यावेळी काँग्रेस वगळता सर्वच महाविकास आघाडी सरकारमधील मित्रपक्षाने हजेरी लावली. दुसरीकडे काँग्रेसने या मेळाव्याला पाठिंबा दर्शवला मात्र मेळाव्यापासून दूर राहणे पसंत केले.
काँग्रेस या मेळाव्यापासून बिहारमधील येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीमुळे दूर राहिली आहे. मनसे नेते राज ठाकरेंची भूमिका परप्रांतीय विरोधातील राहिली आहे. त्यामुळे मुंबईत बिहार व उत्तरप्रदेशातील नागरिक मोठ्यासंख्येने राहतात. त्यामुळे बिहारमधील मतदान काँग्रेसच्या विरोधात जाऊ नये यासाठी कॉंग्रेसने या मेळाव्यापासून चार हात दूर राहणे पसंत केले आहे.
बिहार निवडणुकीचा दबाव
बिहारसारख्या राज्यात काँग्रेसच्या पारड्यात मोठ्या प्रमाणात मते यावीत यासाठी रणनीती आखली जात आहे. राष्ट्रीय स्तरावर मोदी सरकारविरोधात एकजूट होण्याची गरज असताना, बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्यात उमेदवारी वाटपावरून तणाव दिसून आला आहे. अशा स्थितीत काँग्रेस पूर्ण ताकद बिहारकडे वळवलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील घटक पक्षांच्या घडामोडींना तात्पुरती दुर्लक्ष केले जात आहे.
महाराष्ट्रातील विजयी मेळाव्याकडे पाठ
उद्धव ठाकरे यांनी घेतलेला विजयी मेळाव्याला मोठा प्रतिसाद लाभला. त्यामुळे त्यांना मिळालेले जनसमर्थन हा त्यांच्या पक्षासाठी महत्त्वाचा होता. हा मेळावा, फक्त ताकद दाखवण्यासाठी नव्हे तर भाजपाविरोधातील भावनिक एकत्रतेचे प्रतीक म्हणून मांडला गेला. मात्र, या सोहळ्यात काँग्रेसने सक्रिय सहभाग न दर्शविल्याने युतीतील अंतर्गत दुरावा स्पष्ट झाला आहे.
दोन आघाड्यांवर काँग्रेसची कसरत
काँग्रेस सध्या दोन पातळ्यांवर झगडताना दिसत आहे. एकीकडे राष्ट्रीय अस्तित्वासाठी संघर्ष निर्माण झाला आहे तर दुसरीकडे राज्यपातळीवरील युतीसंबंध सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. या दोन्ही दिशांमध्ये समतोल राखणे काँग्रेससाठी अत्यंत अवघड झाले आहे. बिहारमध्ये जिंकण्यासाठी त्यांना आरजेडीसोबत हातमिळवणी करावी लागत आहे, तर महाराष्ट्रात ठाकरे गट आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याशी युतीसंबंध टिकवावे लागणार आहेत. त्यामुळे या दोन्ही आघाडीवर कसरत करावी लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.