Gokul Dudh Sangh : Satej Patil-Hasan Mushrif Sarkarnama
विश्लेषण

Hasan Mushrif: हसन मुश्रीफ सापडले राजकीय धर्मसंकटात, युतीधर्म पाळणार की मित्राची साथ देणार..?

Kolhapur Poitics : गोकुळ दूध संघातील राजकारणामुळे त्यांनी मैत्री जपली असली तरी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांना युतीधर्म पाळावा लागणार आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याशी मैत्री टिकवावी तर युतीधर्म मोडावा लागणार आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : गेल्या पंधरा वर्षे महापालिकेच्या राजकारणात केंद्रस्थानी राहणाऱ्या काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यातील मैत्रीला राज्यातील समीकरणामुळे धक्का लागला आहे. कोल्हापूर महानगरपालिकासह जिल्ह्यातील सहकारी संस्थेत आपण म्हणेल तोच पदाधिकारी असा तोरा मिरवणाऱ्या या मैत्रीरुपी राजकारणाला आगामी राजकारणात ब्रेक लागणार आहे.

गोकुळ दूध संघातील निभावलेली मैत्री आणि त्यातून महायुतीचा अध्यक्ष करून स्वार्थ साधून घेतलेल्या वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांना भविष्यातील राजकारणात युतीधर्म पाळावा लागणार आहे.

गोकुळ दूध संघातील राजकारणामुळे त्यांनी मैत्री जपली असली तरी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांना युतीधर्म पाळावा लागणार आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याशी मैत्री टिकवावी तर युतीधर्म मोडावा लागणार आहे. जर युतीधर्म पाळायचा असेल तर मैत्री गंगेच्या पाण्यात विसर्जित करावी लागणार आहे. त्यामुळे मंत्री मुश्रीफ हे सध्यातरी राजकीय कात्रीत सापडल्याची चर्चा आहे.

गेली अनेक दशके कोल्हापूर महानगरपालिकेवर असणाऱ्या महाडिक गटाच्या सत्तेला बाजूला करून काँग्रेसने ते आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी समजूता घडवून आणला. गेल्या पंधरा वर्षापासून या महानगरपालिकेवर मुश्रीफ आणि पाटील गटाची सत्ता आहे. कोणीच नाराज नको यासाठी महापौरपदाचीही खांडोळी करण्यात आली. महानगरपालिकेच्या राजकारणात मागील निवडणुकीत तब्बल 44 नगरसेवक निवडून आणत एक हाती सत्ता स्थापन केली. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मंत्री मुश्रीफ यांच्यावर महायुतीचा दबाव आहे.

आगामी सर्वच निवडणुका त्यांना महायुतीच्या झेंड्याखाली लढवाव्या लागणार आहेत. त्यामुळे गेली पंधरा वर्षे कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि इतर सहकारी संस्थेत असणारी मैत्री रुपी राजकारण आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत एकही मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला नाही.

शिवाय ज्या संस्थेंवर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांची सत्ता आहे. आशा संस्थांवर मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर दबाव टाकून त्यादेखील आपल्याच नियंत्रणात आणण्याचा डाव महायुतीचा आहे. एकप्रकारे पाटील यांच्या राजकारणाला ब्रेक लावण्याचे काम महायुतीकडून सुरू आहे.

सध्या जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहता महायुतीला सतेज पाटील हेच एक मोठे आव्हान आहे. सतेज पाटील यांच्यावर थेट टारगेट न करता मंत्री मुश्रीफ यांनाच हाताशी धरून त्यांचा राजकीय गेम करण्याचा डाव सुरू आहे. जेणेकरून या दोघांची मैत्री संपुष्टात येईल हाच कुटील डाव महायुतीचा आहे.

भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि आगामी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत हाच डाव खेळाला जाण्याची शक्यता आहे. सतेज पाटील हे एकमेव विरोधक डोळ्यासमोर ठेवून महायुतीची प्रत्येक चाल यशस्वी करण्याचा प्रयत्न वरिष्ठ नेत्यांचा दिसत आहे.

सध्या आमदार सतेज पाटील हे विधान परिषदेचे आमदार आहेत. जिल्ह्यातील दहा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजयी होणाऱ्या नगरसेवकांना निधी कुठून उपलब्ध होणार? याची चिंता आहे. त्यामुळे अनेकांना महायुतीकडून बळ दिले जाणार आहे.

त्यामुळे सहाजिकच आमदार सतेज पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. त्याचबरोबर मंत्री मुश्रीफ यांच्यावर महायुतीची जबाबदार असणार आहे. यापूर्वी खांद्याला खांदा लावून लढलेले पाटील आणि मुश्रीफ आता मात्र भविष्यात एकमेकांच्या विरोधात ठाकणार आहेत हे नक्की.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT