
Pune News : आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. पक्षाच्या स्थानिक नेतृत्वात बदल व्हावा अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. सध्या प्रभारी शहराध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या अरविंद शिंदे यांच्या जागी नवीन अध्यक्ष नेमावेत, यासाठी काँग्रेस (Congress) पक्षाच्या काही गटानी हालचाली सुरू केल्या असून, या पदासाठी तीन प्रमुख नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यानही काँग्रेसच्या एका गटाने शहराध्यक्ष बदलण्याची मागणी करत मोठ्या प्रमाणावर लॉबिंग केले होते. मात्र, त्यावेळी निवडणूक जवळ असल्याने आणि पक्षात गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून वरिष्ठ नेत्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, आता महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्याने पुन्हा नेतृत्व बदलाची मागणी जोर धरू लागली आहे.
सतेज पाटील (Satej Patil) यांची अचानक पुण्यात भेटपक्षातील संघटनात्मक बदलांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने निरीक्षक बंटी पाटील यांना पुण्यात पाठवले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी काही आठवड्यांपूर्वी पुण्याचा दौरा करून स्थानिक कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली होती. मात्र, त्यानंतर बंटी पाटील हे पुण्यात परत फिरकलेच नाही. त्यांचा अहवाल न आल्याने प्रत्यक्ष पदाची निवड लांबणीवर पडली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झाली.
त्यानंतर पुण्यातील अहवालाबाबत पक्षश्रेष्ठींकडून दबाव निर्माण झाल्याने ते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी तातडीने पुन्हा पुण्यात दाखल होत बैठक घेतली. मंगळवारी संध्याकाळपासूनच रात्री उशिरापर्यंत काँग्रेस भवनमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू होत्या.
शहराध्यक्ष पदासाठी अविनाश बागवे, संजय बालगुडे आणि सुनील मलके ही तीन प्रमुख नावे चर्चेत आहेत. या तिघांनीही पाटील यांची भेट घेतली असून, प्रत्येक जण स्वतःच्या समर्थकांसह शहराध्यक्षपदासाठी दावेदारी सादर करत आहे. याशिवाय अजून एका गटाने चंदू कदम आणि अजित दरेकर यांची नावेही पुढे आणली असल्याचे माहिती समोर आली आहे.
तसेच प्रभारी असलेल्या अरविंद शिंदे यांना आगामी महापालिका निवडणुका होईपर्यंत कायम ठेवावं अशी देखील मागणी काहीही केली असल्याचं समोर आलं आहे. अनेक वरिष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाटील यांच्याशी थेट संवाद साधत आगामी महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्यास सक्षम, संघटनात्मकदृष्ट्या मजबूत व सर्वमान्य व्यक्तीचीच शहराध्यक्षपदी निवड व्हावी, अशी भूमिका मांडली आहे. त्याच्या नेतृत्वावर नाराजी देखील व्यक्त केली आहे.
बंटी पाटील यांनी यावेळी संघटनात्मक बदल करण्याबाबत योग्य निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात येईल, असं आश्वासन उपस्थित त्यांना दिला आहे. मात्र, त्यापूर्वी आगामी 14 तारखेला होणाऱ्या मशाल रॅलीमध्ये गटबाजी बाजूला ठेवून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.