Vidarbha News: आमदार जोरगेवारांनी मुत्सद्दी मुनगंटीवारांशी पंगा घेतला खरा...,पण चंद्रपूर महापालिका वाटते तितकी सोपी नसणार!

Sudhir Mungantiwar Vs Kishor Jorgewar : सुधीर मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातला सुप्त संघर्ष पक्षासमोर महापालिका निवडणुकीत प्रतिस्पर्धी विरोधकापेक्षा भाजप समोर मोठं आव्हान असणार आहे.
Sudhir Mungantiwar and Kishor Jorgewar
Sudhir Mungantiwar and Kishor Jorgewar Sarkarnama
Published on
Updated on

Chandrapur News : गेली कित्येक वर्षे चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीची धुरा माजी मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एकहाती सांभाळली होती. पण भाजपनं यंदा चंद्रपुरात नवा डाव टाकतानाच मुनगंटीवारांना धक्का देत आमदार किशोर जोरगेवार यांच्या पसंतीचा शहराध्यक्ष दिला आहे. त्याचमुळे सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि जोरगेवार यांच्यातला सुप्त संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. याचाच फटका भाजपला चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चंद्रपुरात भाजपनं किशोर जोरगेवारांना थोडंसं झुकतं माप देतानाच जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा असलेले सुधीर मुनगंटीवार नाराज होणार नाही याचीही काळजी घेतली आहे.शपथविधीच्या काही तास आधी मंत्रिमंडळातून पत्ता कट झालेल्या मुनगंटीवार यांच्या समर्थकालाही जिल्हाध्यक्षपदावरुन दूर करण्यात आलं.पण तरीही कार्यकर्त्यांची फौज सध्यातरी मुनगंटीवार यांच्याकडेच असल्याचं बोललं जात आहे.

चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवारांसाठी (Kishor Jorgewar) आगामी महापालिका निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची असणार आहे.पण ही निवडणूक त्यांच्यासाठी निश्चितच सोपी नसणार आहे.कारण जोरगेवारांच्या पसंतीचा शहराध्यक्ष भाजपनं देताना सोबतच मुनगंटीवार नाराज होणार नाही याचीही काळजी घेतली आहे.पण ग्रामीणचं जिल्हाध्यक्षपद त्यांना देण्यात आलं आहे.याखेळीद्वारे भाजपकडून स्थानिक पातळीवर समन्वय साधला गेला असल्याचा संदेश दिला असला तरी नेत्यांच्या मनामधून तो अद्याप दूर झालेला नसल्याचंच बोललं जात आहे.

महाराष्ट्र भाजपच्या राजकारणातील चतुरस्त्र,अभ्यासू व्यक्तिमत्व,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या आणि भाजपची धडाडती तोफ म्हणून ओळखल्या जाणार्‍या सुधीर मुनगंटीवार यांचा ऐनवेळी फडणवीसांच्या मंत्रिमंडळातून पत्ताकट झाला. यामुळे तापलेल्या मुनगंटीवारांनी वारंवार उघडउघड नाराजी बोलून दाखवली. त्यांनी अधिवेशनासह,भाजपच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना मारलेली दांडी यांद्वारे नाराजीचा संदेश पक्षपातळीवर अधोरेखित करण्याचा जोरदार प्रयत्न केला होता.

Sudhir Mungantiwar and Kishor Jorgewar
Vidarbha Election:भाजपमध्ये मुनगंटीवारांविरोधात असंतोष तर काँग्रेसच्या गोटात वर्चस्वाची लढाई; चंद्रपूर महापालिकेत कोण बाजी मारणार?

चंद्रपूर महापालिकेवर भाजपची सत्ता होती. 66 नगरसेवकांची ही महापालिका असून यात भाजपचे 36 तर काँग्रेसचे 20 निवडून आले होते. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे या परिसरात फार काही अस्तित्व नाही. त्यामुळे येथे थेट लढत भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्येच होत असते.

चंद्रपूर भाजपमध्ये सध्या मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात सर्व आमदार एकत्रित झाले आहेत. भाजपच जिल्हाध्यक्षाच्या निवडीवरून मोठा असंतोष उफाळून आला असताना महापालिकेची निवडणूक होणार असल्याने याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Sudhir Mungantiwar and Kishor Jorgewar
Shivsena News : एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक; सोलापुरात काँग्रेसचा आणखी एक बडा नेता शिवसेनेच्या ताफ्यात

लोकसभा निवडणुक लढवण्यास स्पष्ट नकार दिलेल्या सुधीर मुनगंटीवारांना पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर मैदानात उतरावं लागलं. या निवडणुकीत त्यांनी विजयासाठी म्हणावी ताकद लावली नाही.याचाच फटका म्हणून भाजपला चंद्रपूरची हक्काची जागा गमवावी लागली. याचाच फटका की काय मंत्रिमंडळातलं नाव निश्चित मानलं जात असतानाच मुनगंटीवारांना ऐनवेळी डच्चू मिळाला.

याचनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपात दुफळी निर्माण झाल्याचं दिसून आलं. आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार या दोन्ही नेत्यांमध्ये सुप्त संघर्षाची ठिणगी पडली. जोरगेवार यांनी मुनगंटीवार यांना अनेक धक्के दिले. त्यात त्यांना राज्यातील नेत्यांचीही पडद्यामागून पूर्ण साथ मिळाली.

Sudhir Mungantiwar and Kishor Jorgewar
Shivsena Politics : 'चंद्रहारसाठी राऊतांनी शिवसेनेची वाट लावली... ठाकरेही पॉलिश गदेवर भाळले' : सांगलीतील पदाधिकाऱ्यांची खदखद बाहेर

भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवडीतही या दोन्ही गटांमध्ये वर्चस्वाची लढाई दिसून आली. पण वरिष्ठ नेत्यांनी अखेर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता मुनगंटीवार आणि जोरगेवार अशा दोन्ही नेत्यांची मर्जी राखली. यात महानगर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी जोरगेवार समर्थक सुभाष कासनगोट्टवार तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची धुरा मुनगंटीवार समर्थक हरीश शर्मा यांच्याकडे सोपवण्यात आली.

सध्या चंद्रपूरमध्ये भाजपचे पाच आमदार आहेत. कागदावर आणि कार्यकर्त्यांच्या पातळीवर भाजपच सर्वाधिक सक्रिय दिसत आहे. महापालिकेची निवडणूक भाजपला जिंकणे फारसे अवघड नाही असेच चित्र चंद्रपूरचे आहे. यात भाजपच्या दृष्टीनं संघटन बांधणी,कार्यकर्त्यांची मजबूत फळी,पक्षाचं सहकार्य, पाठिंबा आणि शिस्त या जमेच्या बाजू आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातला सुप्त संघर्ष पक्षासमोर महापालिका निवडणुकीत प्रतिस्पर्धी विरोधकापेक्षा मोठं आव्हान असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com