Maharashtra Politics News  Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Politics : भाजपने सरकार पाडून दाखवले; महाविकास आघाडीला मात्र जमेना...

Battle between Maha-Yuti and Maha-Aghadi: -युती सरकार पाडण्याबाबत आघाडीकडून तारीख पे तारीख.

अय्यूब कादरी

Pune News : राज्यातील विरोधी पक्षात असणारे नेते सरकार लवकरच पडणार, अशा वल्गना वारंवार करताना दिसले आहेत.  विविध माध्यमांतून 2019 पासून लोकांच्या कानावर हे सतत पडत आले आहे. भाजपच्या नेत्यांनी अडीच वर्षांनी का होईना, महाविकास आघाडी सरकार पाडून दाखवले. महायुतीचे सरकार आल्यापासून मग पुन्हा महाविकास आघाडीचे नेते सरकार पडणार असल्याचे दावे सातत्याने करत आहेत. सरकार लवकरच पडणार, तर कधी एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार नाराज अशी वक्तव्ये शिवसेना नेत्यांकडून केली जात आहेत. ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी गेल्या वर्षी अशा नाराज नेत्यांची यादी वाचून दाखवली होती. मात्र, सरकारांवर याचा कोणताही परिणाम होताना पाहिला मिळत नाही.

 40-45 आमदार फुटणार नाही हा अंदाज चुकला !

भाजपचे  2019 च्या निवडणुकीत १०५ आमदार निवडून आले होते. प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजपची युती निवडणुकीनंतर तुटली होती. शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीशी घरोबा केला आणि महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले.105 आमदारांना सांभाळायचे म्हटले तर हे सरकार अस्थिर आहे, असे चित्र निर्माण करण्याशिवाय भाजपसमोर गत्यंतर नव्हते. मात्र, भाजपचे नेते फक्त बोलून शांत बसले नाहीत, त्यांनी सरकार अस्थिर करण्यासाठी आतून हालचाली सुरू केल्या होत्या. महाविकास आघाडीतील पक्ष निश्चिंत राहिले, त्यांना भाजपच्या प्रयत्नांची कल्पनाच आली नाही. 40-45 आमदार फुटणार नाहीत, असा समज महाविकास आघाडीतील पक्षांचा झाला होता. संख्याबळ नसताना अनेक राज्यांत फोडाफोडी, जुळवाजुळव करून सरकारे स्थापन केलेल्या भाजपला हलक्यात घेण्याची चूक महाविकास आघाडीला महागात पडली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

 तारीख पे तारीख!

अडीच वर्षांनंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. उद्धव ठाकरे यांच्याकडे जेमतेम 15-16 आमदार राहिले. सरकार कोसळल्यानंतर फुटीची भीती काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही लागून राहिली होती. दीड वर्षानंतर शिवसेनेसारख्या फुटीची लागण राष्ट्रवादीलाही झाली. तत्पूर्वी, शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्या सामाजिक चळवळीत कार्यरत होत्या. विविध विषयांचा गाढा अभ्यास आणि उत्कृष्ट वक्तृत्वशैलीच्या बळावर त्या सभा गाजवू लागल्या. शिंदे गटाच्या कळीच्या मुद्द्यांना हात घालू लागल्या. शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर अंधारे यांनी शिवसेनेची बाजू एकहाती, समर्थपणे सांभाळली. ठाकरे गटासह काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार सांभाळण्यासाठी आता महाविकास आघाडीकडून ही युती सरकार पडण्याच्या तारखा दिल्या जाऊ लागल्या, आमदार नाराज असल्याच्या बातम्या पेरल्या जाऊ लागल्या. सुरुवातीला या दाव्यांवर चर्चा झाली. लोकांना वाटले महाविकास आघाडी सरकारचे झाले तसेच युती सरकारचे होईल.

न्यायालयीन लढाईत अपयश 

शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण न्यायालयात गेले. या प्रकरणाचा निकाल लवकर लागेल, या आधारावर लोकांनाही हे सरकार पडेल असे वाटू लागले होते. मात्र, या या प्रकरणाची सुनावणी लांगत गेली, निकाल लागणे तर दूरच राहिले. अशा परिस्थितीत आमदार सांभाळणे महाविकास आघाडीतील पक्षांना जिकिरीचे झाले होते. त्यामुळे सरकार पडण्याच्या तारखा आणि नाराज आमदारांची यादी महाविकास आघाडीकडून पुन्हा पु्हा सांगितली जाऊ लागली. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

न्यायालयीन लढाईत अपयश 

नाराजी शमवण्यात यश 

शिवसेनेसारखी फूट राष्ट्रवादीत पडली आणि अजितदादा पवार सत्तेत सहभागी झाले. असे असले तरी सरकार पडण्याच्या तारखा देण्याचा सिलसिला अद्यापही सुरूच आहे. शिंदे गटातील अनेक इच्छुकांना मंत्रिपदे मिळाली नाहीत. त्याबाबत संजय शिरसाट, भरत गोगावले यांच्यासारख्या आमदारांनी अनेकवेळा जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. अजितदादा पवार यांचा गट सत्तेत सहभागी झाल्यामुळे शिंदे गटातील आमदारांच्या या नाराजीला फारसा अर्थ राहिलेला नाही. दरम्यान, गेल्या चार वर्षांत विकासकामांपेक्षा अधिक असे दावे- प्रतिदावे, राजकीय नेत्यांचा कलगीतुरा, आरोप-प्रत्यारोपांचे सत्रच नागरिकांच्या वाट्याला अधिक आले आहेत.

नाराजी शमवण्यात यश 

शिवसेनेसारखी फूट राष्ट्रवादीत पडली आणि अजितदादा पवार सत्तेत सहभागी झाले. असे असले तरी सरकार पडण्याच्या तारखा देण्याचा सिलसिला अद्यापही सुरूच आहे. शिंदे गटातील अनेक इच्छुकांना मंत्रिपदे मिळाली नाहीत. त्याबाबत संजय शिरसाट, भरत गोगावले यांच्यासारख्या आमदारांनी अनेक वेळा जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. अजितदादा पवार यांचा गट सत्तेत सहभागी झाल्यामुळे शिंदे गटीतील आमदारांच्या या नाराजीला फारसा अर्थ राहिलेला नाही. दरम्यान, गेल्या चार वर्षांत विकासकामांपेक्षा अधिक असे दावे- प्रतिदावे, राजकीय नेत्यांचा कलगीतुरा, आरोप-प्रत्यारोपांचे सत्रच नागरिकांच्या वाट्याला अधिक आले आहेत.

(Edited by Sudesh Mitkar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT