Raj Thackeray, Uddhav Thackeray Sarkarnama
विश्लेषण

MNS Marathi issue: वातावरण तापणार! मराठीच्या मुद्द्यावरून मनसेपाठोपाठ उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक; राज्य सरकारची भूमिका काय?

Marathi language politics News : येत्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे गुढीपाडवा मेळाव्याच्या माध्यमातून मनसेने पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : शिवसेनेने स्थापनेनंतर मराठीचा मुद्दा हाती घेतला होता. सुरुवातीच्या काळात शिवसैनिकानी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात यशही त्यांना मिळत गेले. त्यानंतर मनसेने स्थापनेनेनंतर मराठी भाषेचा मुद्दा हाती घेत लावून धरला होता. येत्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे गुढीपाडवा मेळाव्याच्या माध्यमातून मनसेने पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

राज्यभरातील मनसैनिकांनी बँकांमध्ये मराठी भाषेसाठी आग्रह धरत गोंधळ घातल्याचे समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणाला वेग आला आहे. त्यातच आता याच मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेला (MNS) डिवचण्याचाही प्रयत्न केला जातोय तर दुसरीकडे मात्र, मराठी भाषेच्या मुद्द्यावर राज्य सरकारची भूमिका मात्र गुलदस्त्यातच दिसत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच रण तापण्यास सुरुवात झाली आहे.

गुढीपाडवा मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यभरातील मनसैनिकांनी बँकांमध्ये मराठी भाषेसाठी आग्रह धरण्यास सांगितले होते. काही ठिकाणी अधिकारी मराठी भाषेत बोलत नसल्याने काम करताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले होते. त्यांनी बँकेत मराठी भाषेचा आग्रह धरल्याने काही ठिकाणी गोंधळ घातल्याचे प्रकार समोर आल्याने वातावरण तापले आहे.

त्यानंतर मनसैनिकांना उत्तर देण्यासाठी दोनच दिवसापूर्वी शिंदेंच्या शिवसेनेकडून पोस्टरबाजी करण्यात आली होती. तर दुसरीकडे त्यांना मनसैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. दुसरीकडे मात्र आता या वादात ठाकरेंच्या शिवसैनिकांनी उडी घेतली आहे. त्यांच्याकडूनही मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्या माध्यमातून मराठीचा आग्रह धरणारी पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात आली आहेत.

मनसैनिकांनंतर आता ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून मराठीचा आग्रह धरणारी पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात आली आहेत. मराठीचा आग्रह धरता धरता ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेला डिवचण्याचाही प्रयत्न केला आहे. 'घाबरू नका, चला मराठी शिकूया...' असे म्हणत आम्ही मराठी मराठी माणसाला शिकवणार असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेकडून पोस्टर लावण्यात आले आहेत. एकीकडे मनसेकडून परप्रांतीयांवर मराठीच्या मुद्द्यावरून दबाव टाकला जात असतना दुसरीकडे ठाकरे गटाकडून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना धमकी न देता सगळे मिळून मराठी शिकूया...अशा स्वरूपाची बॅनर ठाकरेसेनेच्या वतीने लावण्यात आली आहेत.

बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर केला जात नसल्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारने भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे महायुती सरकार काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. त्यातच मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर राज्यातील ज्या बँकांचे व्यवहार मराठीत होत नाहीत, यासाठी सर्व समित्याची बैठक घेणार असल्याचे सांगत आणि काय कारवाई करता येतील याबाबत निर्णय घेणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. एकीकडे राज्यभरात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असतानाच येत्या काळात या मुद्द्यावर महायुती सरकारकडून काय तोडगा काढला जाणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT