Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती; एक नव्हे तर दोन प्रकरणांचा लागणार छडा ?

key evidence found News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता नवा ट्वीस्ट येण्याची शक्यता आहे. देशमुख हत्या प्रकरणात अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा झाला आहे.
Santosh Deshmukh News Beed
Santosh Deshmukh News Beedsarkarnama
Published on
Updated on

Beed News : केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. गेल्या काही दिवसापासून तपास यंत्रणेने जवळपास सर्व पुरावे गोळा केले आहेत. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई सुरु करण्यात आली आहे. त्यासोबतच या प्रकरणी आता बीड कोर्टात सुनावणी सुरु आहे. त्यातच तपास करीत असताना पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा आला आहे. त्यामुळे येत्या काळात एक नव्हे तर दोन हत्या प्रकरणाचा उलगडा या पुराव्यामुळे होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता नवा ट्वीस्ट येण्याची शक्यता आहे. देशमुख हत्या प्रकरणात अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा झाला आहे. या हत्या प्रकरणातील आरोपींकडे सापडलेल्या पुराव्यातून आणि इतर माहितीवरून संतोष देशमुख यांच्यावर एका महिलेसोबत अनैतिक संबंध व तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा खोटा आरोप करण्यात येणार होता. मात्र, त्यांचा हा डाव यशस्वी झाला नाही. त्यातच आरोपीने केलेल्या या कटात सहभागी असल्याचा कथित संशय असलेल्या कळंब येथील मनीषा बिडवे या महिलेची हत्या झाली.

Santosh Deshmukh News Beed
Political impact of Wakf support : 'वक्फ'ला पाठिंबा दिल्याने नितीश कुमार, चंद्राबाबुंची राजकीय कोंडी? मुस्लिम समाज दुरावणार!

दरम्यान, मनीषा बिडवे या महिलेच्या हत्येप्रकरणी दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे. मनीषाचा मृतदेह सापडल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात या मयत महिलेचा सहभाग असल्याचा आरोप केल्यानंतर हे हत्या प्रकरण चर्चेत आले होते.

Santosh Deshmukh News Beed
Maharashtra School Uniform : वाजत गाजत सुरु केलेल्या 'एक राज्य, एक गणवेश' योजनेला ब्रेक; रचना अन् रंगाचे अधिकार शालेय व्यवस्थापन समितीकडे!

या हत्या प्रकरणानंतर मृत महिलेचा मोबाइल सापडत नव्हता. आरोपी सापडल्यापासून पोलीस (Police) महिलेचा मोबाइल शोध घेत होते. दरम्यान, मनीषा बिडवे खून प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागला आहे. हा पुरावा पोलिसांच्या हाती आल्याने काही गोष्टींचे गूढ उकलण्यास मदत होणार आहे. मयत मनिषा बिडवेचा मोबाईल पोलिसांना सापडला आहे. आरोपी रामेश्वर भोसलेच्या घरी मोबाईल सापडला. मोबाईल सापडल्याने महिला कोणाच्या संपर्कमध्ये होती हे उघड होणार आहे.

Santosh Deshmukh News Beed
Shivsena UBT Politics : अंबादास दानवेंनी घेतली इम्तियाज जलील यांची भेट; 'स्थानिक'च्या निवडणुकांपूर्वी ठाकरे गटातील अंतर्गत वाद उफाळणार?

त्यामुळे आता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी यामधील आरोपीचा काय संबंध आहे का ? हे पुढे येणार आहे. त्याशिवाय या महिलेची हत्या कोणत्या कारणासाठी करण्यात आली, हे निष्पन्न होणार आहे. त्यामुळे हा महिलेचा सापडलेला मोबाइल आता या दोन्ही हत्या प्रकरणासाठी महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. पोलीस दोन्ही आरोपींना घेऊन बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील उमरा गावात दाखल झाले आहेत. आरोपीच्या गावच्या परिसरात आरोपी व मनीषा बिडवे बाबत पोलिसांची चौकशी सुरू असल्याचे समजते.

Santosh Deshmukh News Beed
Devendra Fadnavis: फडणवीसांची मोठी कबुली; म्हणाले, 'मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षातून त्याचवेळी मंगेशकर हॉस्पिटलला संपर्क,पण...'

दरम्यान, संतोष देशमुख यांना खोट्या आरोपात अडकवण्याच्या कटात सहभागी असलेली ही महिला मृत मनिषा नसल्याचे धनंजय देशमुख यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तर पोलिसांनी देखील या मृत महिलेचा त्या प्रकरणाशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. तर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांच्या आरोपामुळे मनिषा बिडवे हत्या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे आता या मोबाईलमधून काय उलगडा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Santosh Deshmukh News Beed
Sanjay Raut Video : 'तू दलाल...माझ्या नादाला लागू नको नाहीतर नागडा करीन', संजय राऊत 'या' खासदारावर संतापले; नको नको ते बोलले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com