UBT Shivsena : ठाकरेंच्या शिवसेनेचा 'स्थानिक'च्या निवडणुकासाठी 'मास्टर प्लॅन'; 'या' चार मोठ्या महापालिका 'टार्गेट'वर

Thackeray Shiv Sena News : शिवसेना ठाकरे गटाने आतापासूनच आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची तयारी युद्धपातळीवर सुरु केली आहे. त्यातच आता राज्यातील 4 महानगर पालिकेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
Uddhav Tahckeray
Uddhav TahckeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळवल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीतही यश मिळेल, अशी अपेक्ष होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत महायुतीने कमबॅक करीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव केला. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून ठाकरे गट ताकही फुंकून पित आहे. शिवसेना ठाकरे गटाने आतापासूनच आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची तयारी युद्धपातळीवर सुरु केली आहे. त्यातच आता राज्यातील 4 महानगर पालिकेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील (MVA) ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. दिवसेंदिवस पक्षातून जाणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच आता पक्षाने निवडणुकांची जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यासाठी ठाकरे गटाकडून नेतेमंडळींची एकत्रित मोट बांधली जात असून नेतेमंडळीने कामाला देखील सुरुवात केली आहे. त्यानुसार आता आठवडयाला नेतेमंडळीच्या बैठका होत असून त्यामध्ये रणनीती ठरवली जात आहे.

Uddhav Tahckeray
Political impact of Wakf support : 'वक्फ'ला पाठिंबा दिल्याने नितीश कुमार, चंद्राबाबुंची राजकीय कोंडी? मुस्लिम समाज दुरावणार!

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी राज्यातील चार महानगर पालिकेवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. त्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या महानगर पालिकेवर विशेष लक्ष असणार आहे. या चारही पालिकेत सध्या प्रशासकांचा कारभार सुरु आहे. त्यामुळे या चार महापालिकेवर उद्धव ठाकरे गटाचा (Uddhav Thackeray) विशेष वॉच येत्या काळात असणार आहे. त्यामाध्यमातून या ठिकाणी प्लॅनिंग केले जात आहे.

Uddhav Tahckeray
Maharashtra School Uniform : वाजत गाजत सुरु केलेल्या 'एक राज्य, एक गणवेश' योजनेला ब्रेक; रचना अन् रंगाचे अधिकार शालेय व्यवस्थापन समितीकडे!

आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर या चारही महानगरपालिका जिंकण्याची जबाबदारी ठाकरे गटाकडून नेते आणि उपनेत्यावर दिली जाणार आहे. ही जबाबदारी काही विशेष नेत्याकडे सोपवली जाणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता मोठी जबाबदारी येत्या काळात असणार आहे.

Uddhav Tahckeray
Sanjay Raut Video : 'तू दलाल...माझ्या नादाला लागू नको नाहीतर नागडा करीन', संजय राऊत 'या' खासदारावर संतापले; नको नको ते बोलले

येत्या मंगळवारी शिवसेना ठाकरे गटाची मिटिंग होणार आहे. त्यावेळी येत्या निवडणुकीसाठी होणाऱ्या या बैठकीत नेते आणि उपनेत्यावर महानगरपालिकेच्या दृष्टीने स्वतंत्र जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. त्यानंतर महापालिकानिहाय प्रत्येकाना जबाबदारीचे वाटप केले जाणार असल्याची माहिती सूत्रांने दिली आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Uddhav Tahckeray
MP Sanjay Raut News : संजय राऊत म्हणतात, ती यादी खरी नाही...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com