पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा महाराष्ट्र दौरा हजारो कोटींच्या आधुनिक विकास कामांचे लोकार्पण करणारा त्याच बरोबर नव्या प्रोजेक्ट चा पाया रचणारा होता. गतीमान मुंबईत अटल सेतूचे महत्व अधोरेखित करणारा होता. अयोध्येतील श्रीराम मंदिर उदघाटन सोहळ्याबरोबर प्रभु श्रीराम यांच्या पंचवटी कनेक्शनला आध्यात्मिक पध्दतीने जोडणारा होता. महाराष्ट्राची संत परंपरा आणि आधुनिक महाराष्ट्र यांचा संगम या दौऱ्यात दिसला.
अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणातून हिंदू समाजाला एकत्र करत पुन्हा एकदा स्वच्छता संदेश देण्यात आला. मंदिर तसेच धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेचा मुद्दा मोदींनी अधोरेखित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाशिक आणि मुंबई येथील मुद्देसुद तसेच जोशपूर्ण भाषण त्यांची आक्रमक कार्यशैली अधोरेखित करत होती. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशाला पंचसूत्री दिली.
अयोध्या आणि पंचवटी कनेक्शन : श्रीरामांवर ट्रस्ट
अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणारा प्राणप्रतिष्ठा सोहळा, राम मंदिर (Ram Temple) उदघाटन सोहळ्याकडे संपूर्ण देशाबरोबर जगाचे लक्ष आहे. त्यापूर्वी नाशिक येथील काळाराम मंदिरात दर्शन, पूजन, स्वच्छता अभियान राबवित पंतप्रधानांनी पुन्हा एकदा 'जय श्रीरामांचा' जयघोष केला. नाशिकचा रोड शो आणि त्याला मिळालेला स्थानिकांचा प्रतिसाद, 'जयश्रीराम' चा जनतेचा जयघोष, त्याच बरोबर 'मोदी, मोदी' नावाचा गजर, ही त्यांच्या यशस्वी वाटचालीचे दर्शन घडवित होता. नाशिकच्या पंचवटीत मोदींनी महाराष्ट्रातून देशात पुन्हा एकदा श्रीरामांवर ट्रस्ट निर्माण करण्यात महत्वाची भूमिका बजावली.
युवकांना दिले परम वैभवाचे टार्गेट
स्वामी विवेकानंद जयंतीदिनी पंतप्रधानांनी 'फस्ट टाईम व्होटर' यांना देशाच्या भविष्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच युवकांनी राजकारणात येण्याची गरजही व्यक्त केली. इतक्यावरच मोदी थांबले नाही तर त्यांनी युवकांना स्टार्टअप, इन्व्होशन, पेटेंट, आधुनिक तंत्रज्ञान आत्मसाद करण्याचे आवाहन केले. युवकांना विविध श्रेत्रात पराक्रम गाजविण्याचे टार्गेट दिले.
पुढील पंचवीस वर्षात जगाला भारताची शक्ती दाखवून द्या, असे सांगितले. स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारकांचे दाखले देत युवकांना इंजिनिअरींग आणि क्रीडा श्रेत्रात पुढाकाराचा संदेश दिला. जगात भारत तिसरी मोठी आर्थिक शक्ती करण्यासाठी तसेच देशाला नव्या उंचीवर नेण्याचे टार्गेट युवकांना दिले. देशाला परम वैभवावर नेण्यासाठी मोदींनी Narendra Modi युवकांवर मोठा विश्वास व्यक्त केला.
महिला सक्षमीकरणावर भर
मुंबईत मराठीत भाषण देत राजामाता जिजाऊ यांना जयंतीदिनी वंदन करत महिला सक्षमीकरणावर मोदींनी भर दिला. दोन कोटी महिलांना लखपती करण्याची नवी घोषणा करत महिलांच्या कल्याणाची गॅरंटी दिली. महिलांसाठी राबविलेल्या सुकन्या समृध्दीपासून ते उज्वला योजना, महिलांचे प्राॅपर्टीला नाव देण्याचा मोदी सरकारच्या महत्वपूर्ण कार्याची आठवण करुन दिली. नाशिकच्या सभेत मोदींनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला. केंद्र व राज्य सरकारच्या डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर मोदींनी जोर देत मुंब्रा देवीबरोबर मातृशक्तीला वंदन केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काँग्रेसला ठरविले बोगस
इन्फ्रा प्रोजेक्टचा दाखला देत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या काळात 12 लाख कोटींचे इन्फ्रा प्रोजेक्ट होत होते. आता 44 लाख कोटी इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केल्याचा विरोधाभास अधोरेखित केला. देशाच्या विकासात काँग्रेसने प्रोजेक्ट लटकविण्याचे कार्य केल्याची टीका केली. मोदी सरकार काळात टॅक्सपेअरचा पैसा विकासकामांवर खर्च झाल्याचा दाखल देत काँग्रेसने तो विकासकामांसाठी खर्च केला नसल्याचा आरोप केला.
काँग्रेसच्या नियत आणि निष्ठेवर मोदींनी प्रश्न उपस्थित केले. काँग्रेसने सत्तेतून व्होट बँक, घराणेशाही वाढविल्याचा आरोप केला. काँग्रेस म्हणजे 'मेगा स्कॅम' तर मोदी म्हणजे 'मेगा प्रोजेक्ट' असा डिफरन्स मोदींनी सांगितला. नाशिकमध्ये सभेत मोदींनी काँग्रेसवर आगपाखड करत राजकारणातील घराणेशाहीवर प्रहार केला. नाशिक आणि मुंबईत मोदींनी काँग्रेसला बोगस ठरविण्याची एक ही संधी सोडली नाही.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.