Political News : आघाडीत चार जागांवरून तिढा; शरद पवार, उद्धव ठाकरेंवर वंचितसोबतच्या जागावाटपाची जबाबदारी

Political News : राज्यातील लोकसभेच्या चार जागावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षात तिढा आहे.
Sharad Pawar, Uddhav Thackeray
Sharad Pawar, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची शनिवारी दिल्लीत बैठक होत असून यामध्ये महाविकास आघाडीच्या जागावाटपावर चर्चा करण्यात येणार आहे. राज्यातील चार जागावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षात तिढा आहे.

राज्यातील दक्षिण मध्य मुंबई, पुणे, नाशिक आणि दिंडोरी या चार जागावर बैठकीत एकमत झाले नाही. मिलिंद देवरा यांना दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवायची आहे. या चार जागांवरील वाद मिटवून फायनल झालेल्या जागांतून त्यांच्याकडे आलेल्या कोट्यातील काही जागा शरद पवार, उद्धव ठाकरे गटाने स्वाभिमानी पक्ष व वंचितसोबत जागावाटपाची चर्चा करावी असा पर्याय काँग्रेसने सुचवला आहे.

Sharad Pawar, Uddhav Thackeray
Jyotiraditya Scindia : पुणे विमानतळावर शहराचा इतिहास आणि संस्कृती दिसते : ज्योतिरादित्य शिंदे

इंडिया आघाडीने वंचितसोबत जागावाटप करण्याची जबाबदारी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यावर सोपवली आहे. वंचितसोबत जागावाटपाबाबतची चर्चा काँग्रेस करणार नाही. इंडिया आघाडीकडून शरद पवार गट आणि ठाकरे गटावर जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे स्पष्ट केले.

शरद पवार (Sharad Pawar ) गट आणि ठाकरे (Uddhav Thackrey) गट त्यांच्या कोट्यातील काही जागा या वंचित आणि राजू शेट्टी देण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेस दोन्ही पक्षासोबत जागावाटपाबाबत कसलीच चर्चा करणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे उद्या काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे. वंचितने तीन तर राजू शेट्टीने दोन जागाकाही मागणी केली असल्याचे समजते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नवी दिल्लीत इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची शनिवारी बैठक

लोकसभा निवडणुकीच्या तयारीवर बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी जागावाटप, निमंत्रकाच्या नावांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. शनिवारी सकाळी 11.30 वाजता ऑनलाईन बैठक होणार आहे. यावेळची अनेक राज्यातील जागावाटपाबाबत काही अंशी चर्चा झाली आहे, मात्र काही ठराविक जागांबाबत बैठकीत पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे.

(Edited by Sachin waghmare)

Sharad Pawar, Uddhav Thackeray
Sharad Pawar On Rahul Narwekar : निकालानंतर शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला; म्हणाले...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com