c.p.radhakrishn, sudarshan reddy  Sarkarnama
विश्लेषण

Vice President election: उपराष्ट्र्पतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचा मास्टरस्ट्रोक! भाजपची मोठी खेळी, विरोधक चक्रावले

NDA political strategy News : उपराष्ट्र्पतीपदाच्या निवडणुकीत एनडीएने मोठा डाव टाकला आहे. भाजपच्या या खेळीने विरोधक चक्रावले आहेत.

सरकारनामा ब्युरो

New Delhi news : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 9 सप्टेंबरला मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी दहा दिवस उरले असतानाच आता दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे आतापासूनच वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. भाजपच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी ( एनडीए) सध्या त्यांच्या रणनीतीला अंतिम रूप देण्यात व्यस्त आहे. त्यातच उपराष्ट्र्पतीपदाच्या निवडणुकीत एनडीएने मोठा डाव टाकला आहे. भाजपच्या या खेळीने विरोधक चक्रावले आहेत. आठ आणि नऊ सप्टेंबरला 19 संसदीय समितीच्या बैठका बोलावण्यात आल्या आहेत. या बैठकींमुळे खासदाराची दिल्लीतील उपस्थिती निश्चित होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सरकारने हे मोठे पाऊल उचलत विरोधी पक्षाच्या तुलनेत आघाडी घेतली आहे.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन (CP radhakrushnan) व इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना रिंगणात उतरवले आहे. या दोन उमेदवारामध्ये सरळ लढत होत आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता लागली असतानाच भाजपने रणनितीत बदल करीत आठ आणि नऊ सप्टेंबरला 19 संसदीय समितीच्या बैठका बोलावून विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीवर कुरघोडी केली आहे.

आगामी काळात होत असलेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या (BJP) नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीला विजयाबद्दल आत्मविश्वास आहे. मात्र, त्यांना ही निवडणूक मोठ्या फरकाने जिंकायची आहे. त्यामुळे गेलेय काही दिवसापासून प्लॅनिंग केले जात आहे. त्याच रणनीतीचा भाग म्हणून आठ आणि नऊ सप्टेंबरला 19 संसदीय समितीच्या बैठका बोलावण्यात आल्या आहेत. त्यामुळे खासदाराची दिल्लीतील उपस्थिती निश्चित होणार आहे, अशी माहिती सूत्राने दिली आहे.

या बैठकामध्ये सहभागी होणाऱ्या खासदारांना येण्या-जाण्याचे विमान तिकीट आणि दररोज 25 हजार रुपयाचा भत्ता मिळणार आहे. विशेष म्हणजे हे विमान तिकीट खासदारांच्या वर्षाला मिळणाऱ्या 24 मोफत विमान तिकीटा व्यतिरिक्त आहे. त्यामुळे याच आमिषाने खासदारांना दिल्लीत थांबून ठेवण्याची योजना एनडीए आघाडीने आखली आहे.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या बाजूने जास्तीत जास्त मतदान होऊ शकेल, यासाठीच संसदीय समितीच्या बैठका बोलवण्यात आल्या आहेत. बारा लोकसभा आणि तीन राज्यसभेच्या समितीच्या बैठकांचा यामध्ये समाविष्ट आहे. नऊ सप्टेंबरला मतदानाच्या दिवशी लोकसभेच्या चार समित्यांची बैठक ठेवण्यात आल्या आहेत.

या प्रकाराला योगायोग म्हणता येणार नाही. सूत्रांच्या मते सत्ताधारी पक्षाने विचारपूर्वक आखलेली ही रणनीती आहे. तर दुसरीकडे भाजपच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीला विजयाबद्दल आत्मविश्वास नसल्याने अशास्वरूपाचे प्रयत्न केले जात असल्याबद्दल इंडिया आघाडीने टीका केली आहे. विरोधी आघाडी इंडियाच्या अनेक नेत्यांनी याला राजकीय जुळवाजवळ आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर म्हटले आहे.

या निवडणुकीत भाजपला पराभवाचा धोका नाही परंतु मतदानाची टक्केवारी घसरू नये अथवा विजयाचे अंतर कमी होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सत्ताधारी पक्ष प्रत्येक खासदार आणि प्रत्येक मतांसाठी प्रयत्न करीत आहे. तर तिकडे विरोधी पक्ष ही मागे हटण्यास तयार नाही. इंडिया आघाडीकडूनही आपल्या खासदारांनी दिल्लीत थांबवण्याचे निर्देश देण्यात आली आहेत.

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक सहसा बिनविरोध होते किंवा कमी चर्चेत असते. मात्र, एनडीएच्या या खेळीमुळे, ही निवडणूक आता अधिक चुरशीची झाली आहे. एनडीएच्या या 'मास्टरस्ट्रोक'मुळे विरोधी पक्षांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT