Mahayuti Politics Sarkarnama
विश्लेषण

Mahayuti Government : संजय शिरसाटांनी 'तलवारच' काढली... अजितदादा-फडणवीसांशी शिवसेना मंत्र्यांची पुन्हा लढाई !

Mahayuti power struggle News: शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना कमी प्रमाणात निधी देण्यात आल्याने नाराजी उफाळून आली होती. राज्यातील निधीवाटपावरून शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्री व आमदार केंद्रस्थानी आहेत.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतीच पार पडले. त्यामध्ये महायुतीमधील तीन पक्षासाठी निधी वाटपाची घोषणा करण्यात आली. मात्र, निधी वाटपानंतर महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. अनेक खात्यांना निधी वाटप करताना असमतोलपणा दिसत आहे. त्यातच शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना कमी प्रमाणात निधी देण्यात आल्याने नाराजी उफाळून आली होती. राज्यातील निधीवाटपावरून शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्री व आमदार केंद्रस्थानी आहेत.

निधी वाटपातील असमतोलामुळे महायुतीतील तणाव वाढत असून, शिंदे गटाच्या मंत्र्यांची नाराजी त्यामुळे उफाळून आली आहे. विरोधकांनीही सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे निधी वाटपाचा मुद्दा सतत चर्चेत असतो. तीन वर्षापूर्वी राज्यात आघाडी सरकार सत्तेत असताना शिवसेना (Shivsena) आमदाराला निधी वाटप करताना तत्कालीन अर्थमंत्री हात आखडता घेतात असा आरोप करीत शिवसेनेत उभी फूट पडली होती. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

2025 च्या अर्थसंकल्पात भाजपच्या (Bjp) मंत्र्यांना सर्वाधिक 89,128 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना 56,563 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे तर तर शिंदे गटाच्या मंत्र्यांना केवळ 41,606 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या असमतोलामुळे शिंदे गटात नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून सरकारवर आरोप केले जात आहेत.

दुसरीकडे काही दिवसापूर्वीच अतुल सावे पालकमंत्री असलेल्या नांदेड व हिंगोली जिल्ह्यात निधी वाटपावरुन भाजप व शिवसेनेच्या आमदारात वाद झाला होता. त्यामुळे निधी वाटपाची चर्चा जोरात सुरु आहे. त्यातच आता राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रूपयांची मदत जमा होण्यास सुरूवात झाल्याने बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद झळकला असतानाच, महायुती सरकारची मात्र या योजनेला निधी मिळवताना चांगलीच दमछाक होत असल्याचे समोर आले आहे.

दोन कोटी लाभार्थींना दरमहा आर्थिक मदत देण्यासाठी सरकारला इतर खात्यांचा निधी वळवावा लागत आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आला आहे. दोन्ही विभागांचे अनुक्रमे 410 कोटी 30 लाख आणि 335 कोटी 70 लाख रुपये महिला आणि बालविकास विभागाकडे वळविण्यात आले आहेत. याबाबतचा शासन निर्णय शुक्रवारीच जारी करण्यात आला आहे. या निर्णयानंतर सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आल्याने खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसापासून निधी वाटपात शिवसेना शिंदे गटावर मोठया प्रमाणात अन्याय केला जात असल्याची भावना आहे. विशेषतः मंत्री संजय शिरसाट यांनी उघडपणे टीका केली असल्याने पुन्हा एकदा वातावरण तापले असून आता यावर भविष्यात महायुती सरकारकडून कशा प्रकारे मार्ग काढला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकारामुळे विरोधकांनीही महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या सर्व प्रकारामुळे आगामी काळात महायुतीतील अंतर्गत राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT