Congress-BJP Politics : काँग्रेसचे मंत्री भाजपच्या निलंबित आमदाराला फुल भिडले; चॅलेंज स्वीकारत थेट राजीनामा देऊनच आले!

Shivanand Patil Resignation : कर्नाटकात सध्या सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी बाकावर असणाऱ्या भाजपमध्ये आव्हान-प्रतिआव्हान सुरू झाले आहे. याचा फटका सत्ताधारी काँग्रेसला बसला आहे.
shivanand patil Basanagouda Patil Yatnal
shivanand patil Basanagouda Patil Yatnalsarkarnama
Published on
Updated on

Bengaluru News : कर्नाटकात गेल्या काही दिवसापासून भाजपने हकालपट्टी केलेले आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ आणि वस्‍त्रोद्योग, साखर आणि कृषी पणन मंत्री शिवानंद एस. पाटील यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. या शीतयुद्धात सध्या हे दोघेही एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान देत आहेत. दरम्यान पाटील-यत्नाळ दिलेल्या आव्हानाचा सत्ताधारी काँग्रेसला फटका बसला आहे. बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी दिलेले आव्हान पाटील यांनी स्वीकारले. त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याने आता सरकारमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर पाटील यांनी यत्नाळ यांना प्रतिआव्हान दिले आहे.

कर्नाटकात हा वाद पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उफाळला असून प्रतिक्रिया देताना पाटील-यत्नाळ यांचा काँग्रेस आमदारांशी संघर्ष झाल्याचे समोर आलं आहे. यत्नाळ यांनी मंत्री शिवानंद पाटील आणि हुनगुंद मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार विजयानंद काशप्पनवार यांना आव्हान दिले होते.

त्यांनी या दोघांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले होते. पाटील मुस्लिम मतांच्या पाठिंब्याशिवाय निवडणूक जिंकू शकत नाहीत, असा दावा बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी केला होता. तर ते पाकिस्तानचे एजंट' असल्याचा आरोपही केला होता.

shivanand patil Basanagouda Patil Yatnal
Congress CWC Meeting: काँग्रेसची नवी प्रयोगशाळा! कार्यकर्त्यांच्या `फीडबॅक`वर निर्णय घेणार

यानंतर शिवानंद पाटील यांनी पाटील-यत्नाळ यांचे आव्हान स्वीकारले असून आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. तसेच त्यांनी बसवाण बागेवाडी मतदारसंघातून यत्नाळ यांनी निवडणुकीला सामोरं जावं असेही प्रतिआव्हान दिलं आहे. पण आता त्यांचा राजीनामा स्वीकारला जाणार का? येथे पोटनिवडणूक लागणार का? आणि निवडणुकीला भाजपने हकालपट्टी केलेले आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ सामोरं जाणार का हे पाहावं लागणार आहे.

shivanand patil Basanagouda Patil Yatnal
Congress Politics : काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरेंना बदलणार? निरीक्षक कांबळे म्हणाले, "त्यासाठी मी आलो..."

दरम्यान आता शिवानंद पाटील यांनी वैयक्तिक कारणांमुळे आणि स्वाभिमानामुळे राजीनामा दिला आहे. यामुळे कायदेशीरदृष्ट्या याकडे कसे पाहता येईल याचा विचार सरकार करत असल्याचे स्पष्टीकरण सभापती यू.टी खादर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तर शिवानंद पाटील यांनी, मी वैयक्तिक कारणांमुळे आमदारकीचा राजीनामा दिला असून त्यांचा मुख्यमंत्री किंवा काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com