Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ठाकरे गटातील बडा नेता अजितदादांकडे

Thackeray faction leader joins Ajit Pawar News : महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठया प्रमाणात गळती लागली आहे.
Ajit Pawar Slams Uddhav Thackeray
Ajit Pawar Slams Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे राज्यातील चित्रच बदलले आहे. राज्यात महायुतीचे तब्बल 232 उमेदवार निवडून आले. त्यामुळे सध्या महायुतीकडे पक्षप्रवेशासाठी मोठी रांगच गेल्या काही दिवसापासून लागली आहे.

महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठया प्रमाणात गळती लागली आहे. ही गळती कशी रोखणार हा प्रश्न सतावत असतानाच पुन्हा एकदा अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. त्यांच्या ठ गटातील बडा नेता शनिवारी अजितदादांच्या पक्षात प्रवेश करणार आहे.

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीमधील अनेक नेते महायुतीच्या गळाला लागले आहेत. त्याचा मोठा फटका शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाला बसत आहे. ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र आता यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. धुळे जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून माजी आमदार शरद पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे.

Ajit Pawar Slams Uddhav Thackeray
PM Narendra Modi : आज अनेकांची झोप उडणार..! मोदींनी दिले मोठे संकेत, थरूर यांच्याशी ‘शेक हँड’ अन् काँग्रेसवर निशाणा...

मुंबईत शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटात माजी आमदार शरद पाटील प्रवेश करणार आहेत. उद्या दुपारी दोन वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. शरद पाटील हे 2004 ला शिवसेनेचे आमदार होते. त्यानंतर त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र पुन्हा ते ठाकरे गटात परतले. परंतु विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून तिकीट न मिळाल्याने गेल्या काही दिवसांपासून शरद पाटील नाराज होते.

Ajit Pawar Slams Uddhav Thackeray
PM Modi Pakistan strategy : पंतप्रधान मोदी पाकची कशी जिरवणार? एखादी स्ट्राईक की थेट एक घाव दोन तुकडे?

या नाराजीतूनच त्यांनी शिवसेना ठाकरे गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पाटील हे शिवसेना ठाकरे गटाचे धुळे जिल्ह्यातील मोठे नेते आहेत. त्यांनी अनेक आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला आहे. त्यांच्या या प्रवेशाने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

Ajit Pawar Slams Uddhav Thackeray
India vs Pakistan : PM मोदींनी एकच निर्णय घेतलाय... तोच कायम ठेवला तर हल्ला न करताही पाकिस्तानचा 'बाजार उठू शकतो...'

शरद पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा धुळ्यात ठाकरे गटासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, यापूर्वी देखील ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकारी आणि नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे.

Ajit Pawar Slams Uddhav Thackeray
India-Pak similar city names : हैदराबादपासून लाहोरपर्यंत: भारत अन् पाकिस्तानमध्ये या गावांची नावे आहेत एकसारखी?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com