Murlidhar Mohol, Ravindra Dhangekar Sarkarnama
विश्लेषण

Pune Loksabha : 'कँटोन्मेंट'ची साथ ठरवणार पुण्यात धंगेकर की मोहोळ

Congress Vs BJP : मागील 2014 आणि 2019 मध्ये कँटोन्मेंटमधील मतदारांनी भाजपला साथ दिली होती. मात्र, येथे काँग्रेस उमेदवाराने देखील चांगली मतं मिळवली होती.

अनिल सावळे

Loksabha Election 2024 News : पुणे लोकसभा निवडणुकीत 53.13 टक्के मतदान झाले. त्यामध्ये कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात 53.13 टक्के मतदान झाले. 2019 च्या तुलनेत पाच टक्के मतदान अधिक झाले आहे. एकुण मतदानाच्या 50 टक्के मतदान जो उमेदवार येथे घेईल त्याचा विजयाच्या जवळ पोहोचेल असे दिसते आहे.

मागील तीन लोकसभा निवडणुकांत या मतदारसंघात झालेल्या मतदानापैकी ४६ ते ४९ टक्के मते मिळविणाऱ्या उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, भाजपचे मुरलीधर मोहोळ, वंचितचे वसंत मोरे किती मते घेणार याची उत्सुकता असणार आहे.

मागील 2014 आणि 2019 मध्ये कँटोन्मेंटमधील मतदारांनी भाजपला BJP साथ दिली होती. मात्र, येथे काँग्रेस उमेदवाराने देखील चांगली मतं मिळवली होती. मोदी लाटेत 2014 मध्ये या मतदारसंघात भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांना 46 टक्के म्हणजे 63 हजार 790 मते मिळाली होती.

तर, काँग्रेसचे Congress उमेदवार विश्वजित कदम यांना 49 हजार 859 मतं मिळाली होती. 2009 लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार सुरेश कलमाडी यांनी 52 हजार 671 मतं घेतली होती तर, त्यांचे विरोधी भाजप उमेदवार शिरोळे यांना 25 हजार 587 मतं मिळाली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2019 ला बापटांना साथ

2019 मध्ये काँग्रेसचे मोहन जोशी आणि भाजपचे गिरीश बापट यांच्यामध्ये सरळ लढत झाली. या मतदारसंघामध्ये एक लाख 39 हजार 26 मतदान झाले होते. या मतदानातील 48 टक्के म्हणजे 67 हजार 177 मतदान गिरीश बापट यांना तर, 39 टक्के म्हणजे 54 हजार 444 मतदान मोहन जोशी यांना झाले होते. तर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांना एकुण मतदानातील 10 टक्के मतदान झाले होते.

'वंचित' फॅक्टर

2019 ला या मतदारसंघात वंचितच्या उमेदवाराने 10 टक्के मतदान घेतले होते. गिरीश बापट आणि मोहन जोशी यांच्या मतांमधील अंतर देखील 9 ते 10 टक्क्यांचे होते. त्यामुळे यंदा वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांना या मतदारसंघातून किती मतदान होते. यावर धंगेकर आघाडी घेणार की नाही हे देखील समजेल.

विद्यमान आमदार भाजपचा

मागील विधानसभा निवडणुकीतही बहुतांश मतदारांचा कल भाजपकडे राहिला होता. विद्यमान आमदार सुनील कांबळे भाजपचे असल्याने भाजपला येथून मताधिक्याची अपेक्षा आहे. तर, मागील तीन लोकसभा निवडणुकांमध्ये 2009 ची लोकसभा निवडणूक वगळता पुढील दोन ही लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला येथून लीड मिळाले आहे.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT