Raj Thackeray Sarkarnama
विश्लेषण

Raj Thackeray : मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज ठाकरेंचा हिंदी मुद्दा ठरणार गेमचेंजर ?

Hindi issue in Mumbai News : ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे नेते राज ठाकरे यांनी हिंदीविरोधाचा मुद्दा उचलून धरला आहे

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : आगामी काळात मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीची मुदत संपून तीन वर्षांचा कालावधी झाला आहे. त्यामुळे महापालिकेवर सध्या प्रशासकराज आहे. सुप्रीम कोर्टाने येत्या चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता लवकरच निवडणुका होणार असल्याने त्या अनुषंगाने काही मुद्दे पुढे येत आहेत. त्यामुळे आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे नेते राज ठाकरे यांनी हिंदीविरोधाचा मुद्दा उचलून धरला आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या या निवडणुकीत हिंदीचा मुद्दा राज ठाकरेंसाठी ठरणार गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.

हिंदीभाषा सक्तीच्या विरोधात मनसे नेते राज ठाकरे (Raj thackeray) आक्रमक झाले आहेत. त्यांनी आता पर्यंत राज्य सरकारच्या हिंदी भाषा सक्तीच्या करण्याच्या निर्णयाला उघडपणे विरोध केला आहे. गेल्या चार ते पाच महिन्यापासून त्यांनी हा विषय लावून धरला आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे यांनी सातत्याने सरकारची कोंडी केली आहे.

महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा स्वीकार केला आहे. त्यामुळे मराठी, इंग्रजीसोबत हिंदी भाषादेखील पहिलीपासून सक्तीची करण्यात येईल, असे सांगितले होते. यानंतर सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. या टीकेनंतर सरकारने एक पाऊल मागे घेत हिंदी भाषा ही बंधनकारक नसेल, असे स्पष्ट केले होते. त्यातच आज राज्य सरकारने नवीन जीआर काढला असून त्यात केवळ ‘अनिवार्य’ शब्द वगळला असून, 20 पटसंख्या असल्यास इतर भाषा शिकता येणार, असे नमूद केलेले आहे. मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 5 वीसाठी हिंदी तृतीय भाषा असल्याचा उल्लेख शासन निर्णयात करण्यात आला आहे. त्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे.

राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र दिलं आहे. या पत्रकात राज ठाकरेंनी मुख्याध्यापकांना हिंदी भाषा सक्तीच्या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका, असे आवाहन पत्राद्वारे केले आहे. तुम्ही ठाम राहिलात आणि सरकारचे मनसुबे उधळून लावलात तर आम्ही तुमच्या मागे पहाडासारखे उभे राहू, असेही आश्वासन राज ठाकरेंनी केले आहे.

हिंदीविरोधाचा मुद्दा राज ठाकरेंसाठी मुंबई महापालिका निवडणुकीत बुस्टर डोस मिळवून देऊ शकतो. राज ठाकरे हे महापालिका निवडणुकीदरम्यान, मराठीचे कैवारी म्हणून वावरू शकतात. आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी मतदाराची संख्या जास्त आहे. त्यामुळे मराठी भाषिकांची जुळवा-जुळव करण्याच्या या निमित्ताने राज ठाकरे यांनी मोठे पाऊल उचलले आहे.

आतापर्यांच्या निवडणुकीत मराठी मतदार मोठ्या प्रमाणात शिवसेना ठाकरे गटाच्या बाजूने असल्याचे दिसून येत आहे. मात्र, मनसेकडून मराठी भाषिकांच्या प्रश्नासाठी आवाज उठवला जात असल्याने येत्या काळात त्यांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळेच या मुद्द्यावरून वातावरण तापले जाण्याची शक्यता अधिक आहे.

मुंबई महापालिकेच्या दृष्टीने राज ठाकरे यांच्यासाठी मराठी मुद्दा खूपच महत्वाचा आहे. त्यांनी मराठी माणसाच्या मुद्द्यावरच आतापर्यांतचे आंदोलन केले आहे. याच मुद्द्यावरून मधल्या काळात शिवसेना ठाकरे गटासोबत घेण्याची देखाली तयारी सुरु केली होती. त्यामुळे मनसे-शिवसेना मराठी भाषेच्या मुद्द्यवरून एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत, त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकीत हिदीच्या मुद्द्यावरून मराठी भाषिक मनसेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसेला मोठा फायदा होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT