Raj-Uddhav Thackeray Alliance  sarkarnama
विश्लेषण

Raj Thackeray response : ठाकरे बंधुंची युती स्क्रिप्टेड? अफवा पसरवणाऱ्या पत्रकारांची राज यांनी उडवली खिल्ली

Thackeray brothers alliance News : ठाकरे बंधुंची युती स्क्रिप्टेड? असा आरोप काही जणांकडून केला जात होता. मीरा भाईंदर येथील सभेप्रसंगी भाष्य करताना मनसेचे प्रमुख राज ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवताना अफवा पसरवणाऱ्या पत्रकारांची खिल्ली उडवली.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : हिंदी सक्तीच्या विरोधात राज व उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेल्या मनसे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जवळपास वीस वर्षानंतर वरळी येथे मेळावा घेत विजयोत्सव साजरा केला. त्यामुळे शिवसैनिकात उत्साहाचे वातावरण आहे. आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राजकीय दृष्टया ठाकरे बंधू एकत्र येतील, अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यातच ठाकरे बंधुंची युती स्क्रिप्टेड? असा आरोप काही जणांकडून केला जात होता. यावर मीरा भाईंदर येथील सभेप्रसंगी भाष्य करताना मनसेचे प्रमुख राज ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवताना अफवा पसरवणाऱ्या पत्रकारांची खिल्ली उडवली.

ठाकरे बंधू मेळाव्यात एकत्र असले असले तरी आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढवणार? का याची उत्सुकता लागून राहिली आहे. उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना सोबत घेण्याबद्दल सकारात्मक बोलताना दिसत आहेत. तर दुसरीकडे राज ठाकरे सावधपणे भूमिका मांडत आहेत. अशातच एका मुद्द्याने डोकेवर काढले, त्याची चर्चाही जोरात सुरु आहे, तो म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणे हे स्क्रिप्टेड आहे. हा प्लॅन आधीच ठरवून केला गेला आहे, असे काहींचे मत आहे.

मराठी-हिंदी भाषा वादाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र आणि राज्य सरकारच्या त्रिभाषा धोरणाला विरोध म्हणून 5 जुलै रोजी रॅली आयोजित करण्यात आली होती. पण सरकारने हिंदी अनिवार्यतेचा निर्णय मागे घेतल्यानंतर त्या दिवशी विजयी मेळावा झाला. यामुळे फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी हा वाद जाणीवपूर्वक निर्माण केला, असा दावा काही विश्लेषक आणि सोशल मीडिया पोस्ट्समध्ये केला जात आहे.

त्यावर राज ठाकरेंनी मीरा रोडमधील सभेत याचा उल्लेख केला. हे भाजपच्या नेत्यांनी, पत्रकारांनी फेक न्यूजसारखी गोष्ट पसरवली आहे. मराठी, महाराष्ट्रासाठी मी तडजोड करणार नाही. त्यासाठी कुणाच्याही विरोधात जायची तयारी आहे, असे राज ठाकरेंनी ठणकावून सांगत त्यांनी एका वाक्यात विषय संपवला आहे.

त्यासोबतच गेल्या काही दिवसापासून ठाकरे बंधू एकत्र येण्यामागे फडणवीस असल्याचा दावा केला जात आहे. यावेळी राज ठाकरेंनी हा दावा फेटाळून लावताना त्यामधील हवाच काढली आहे. अनेक पत्रकार म्हणतात, स्क्रिप्ट फडणवीसांची आहे. या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना सगळ्यांच्या दबावाला बळी पडून दोन शासन निर्णय मागे घ्यावे लागले.

स्क्रिप्ट असती तर फडणवीसांचा असा अपमान लिहला असता का? स्क्रिप्ट वगैरे काही नाही हे फक्त तुमच्या मनात विष कालवण्याचे प्रयत्न आहेत. माझी कोणाशीही मैत्री असो की शत्रुत्व. मराठी भाषा, मराठी माणूस, महाराष्ट्र या विषयात राज ठाकरे कुणाशीही तडजोड करणार नाही. तुम्हीही करू नका, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र येणे हे निश्चितच पूर्वनियोजित होते, कारण की मराठी विजय रॅलीसाठी समन्वय आवश्यक आहे. पण, देवेंद्र फडणवीस यामागे मास्टरमाईंड असण्याचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. राज ठाकरे यांच्या विधानामुळे आणि फडणवीस यांच्या राज ठाकरे व उद्धव यांच्याशी झालेल्या भेटींमुळे हा दावा पुढे आला. पण राज ठाकरे यांनी त्यावेळी उपरोधिकपणे टोला मारला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT