Ajit Pawar Eknath Shinde sarkarnama
विश्लेषण

Maharashtra political crisis : शिवसेनेच्या मंत्र्यांची नाराजी कायम; तोडगा काढण्याची जबाबदारी राष्ट्रवादीच्याच जुन्या नेत्यावर

Shiv Sena ministers discontent News : कॅबिनेट मीटिंगनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर या वादावर तोडगा काढण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जुन्या नेत्यावर जबाबदारी सोपवली आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापन झाली. त्यानंतर गेल्या काही दिवसापासून महायुतीमधील तीन ही मित्रपक्षात नाराजी कायम आहे. भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजी कायम आहे. विशेषतः निधी वाटपावरून शिवसेनेचे मंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. मंगळवारी झालेल्या कॅबिनेट मीटिंगनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर या वादावर तोडगा काढण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जुन्या नेत्यावर जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

येत्या काळात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे आगामी निवडणूकीत मतदारांसमोर जातांना पुरेसा निधी आणि विकासकामे गरजेची आहेत. याकरता अर्थमंत्री अजित पवार आणि शिवसेना (Shivsena) मंत्र्यांमध्ये समन्वय असणे गरजेचे असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता या बाबत तोडगा काढण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून पावले उचलली जात आहेत. विशेष म्हणजे यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी अर्थखात्यावर लक्ष ठेवावे, अशी सूचना एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र, यावर वाद वाढवत बसण्यापेक्षा नमते घेत आता तोडगा काढला जात आहे.

महायुतीचे (Mahayuti) सरकार येऊन सहा महिन्यापेक्षा जास्तचा कालावधी झाला आहे. मात्र, गेल्या काही दिवसापासून निधीवाटपात शिवसेना मंत्र्यांना सापत्न वागणूक दिली जात असल्याची तक्रारी आहेत. या बाबत काही जणांनी नाराजी व्यक्त केली आहे. या नाराजीवर तोडगा काढण्यासाठी शिवसेनेकडून तातडीची पावले उचलली जात आहेत. त्यामुळेच निधी वाटपबाबत शिवसेना मंत्र्यांची नाराजी पहाता अर्थमंत्री अजित पवारांपर्यंत शिवसेनेची भूमीका पोहोचवून तोडगा काढण्याची जबाबदारी मंत्री उदय सामंत यांना देण्यात आली आहे.

त्यानंतर निधीवाटपात सूसुत्रता आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी अर्थमंत्री अजित पवार आणि शिवसेना मंत्र्यांमध्ये संवादाचा पूल म्हणून उदय सामंत काम करतांना दिसत आहेत. शिवाय उदय सामंत यांचे शिवसेनेत मंत्री म्हणून वजन आहेच. सोबतच राष्ट्रवादीतही जून्या सहकाऱ्यांसोबत ते चांगले संबंध ठेवून आहेत. त्यामुळे उदय सामंत हे रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या तिढ्यावरही समन्वयकाचीच भूमीका पार पाडत आहेत. त्यामुळे शिवसेनेत उदय सामंत यांच्याकरवी निधीवाटपाबाबत समाधानकारक तोडगा निघेल, अशी अपेक्षा शिवसेना नेत्यांना आहे.

मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठक झाली. या कॅबिनेट बैठकीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना मंत्र्यांबरोबर बैठक घेतली. त्यावेळी निधीवाटपावरून अन्याय होत असल्याची तक्रार यावेळी मंत्र्यांनी केली. त्यांनतर मंत्री उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. तर त्यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोन उपमुख्यमंत्र्यांचीही भेट घडून आल्याचे बघायला मिळाले आहे.

आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांना सामोरं जाण्यापूर्वी निधी वाटपाचा घोळ संपावा, याकरता उदय सामंतांनी पुढाकार घेत बैठकीत आपल्या पक्षाची बाजू मांडली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या या नाराजीनाट्य लवकरच संपेल अशी शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT