Mumbai News : विधानसभा निवडणुकीनंतर आता आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला. त्यामुळे महायुतीचा कॉन्फिडन्स वाढला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वबळावर लढायला हवे, असे विचार राज्यातील भाजपचे नेते करू लागले व बोलू लागले आहेत, त्यांना योग्य तो संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत पार पडलेल्या महायुतीच्या सर्व मंत्र्याच्या व आमदारांच्या बैठकीत दिला होता. त्यानंतरही अशा स्वरूपाचे विधाने नेतेमंडळीकडून करण्यात येत आहेत.
त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याचे संकेत भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी दिल्यानंतर त्यावर आता शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी जोरदार टीका केली. या चव्हाणांच्या घोषणेनंतर येत्या काळात महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
महायुतीमधील (Mahayuti) तीन पक्षाने एकत्र मिळून काम केले तरच आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय सोपा जाणार आहे. त्यामुळे तीन पक्षांनी समन्वयाने व एकत्रित काम करण्याचा सल्ला गेल्या महिन्यातच पीएम मोदी यांनी दिला होता. मात्र, याला महिनाभराचा कालावाधी उलटण्यापूर्वीच महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपमधील काही नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी स्वबळाचा सूर आवळला आहे.
राज्यात येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका येत्या काळात होणार आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका महायुती एकत्र की स्वबळावर लढणार यावरून खल सुरु आहे. भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी स्थानिकांच्या निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यावर शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे.
अशोक चव्हाण म्हणजे भाजप (Bjp) नाहीत. अशोक चव्हाण भाजपमध्ये नवीन आहेत. त्यांना युतीधर्माची खूप कमी माहिती आहे. आम्ही भाजपच्या जुन्या मंडळींसोबत हातात हात घालून काम केले असल्याचे सांगत हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्या स्वबळावर निवडणुका लढण्याच्या भूमिकेतील हवाच काढली आहे. त्यामुळे येत्या काळात महायुती स्थानी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाना कशा प्रकारे सामोरे जाणार याची चर्चा पुन्हा रंगली आहे.
काही दिवसांपूर्वीच हेमंत पाटील यांनी अशोकाचे झाड हे दिसायला उंच आणि हिरवेगार असते पण बारा वाजता त्याची सावली केवळ स्वतःलाच मिळते, असे म्हणत नाव न घेता बोचरी टीका केली होती. आता अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही. त्यांना युती धर्माची फार माहिती नाही असेही ते म्हणाले आहेत. हेमंत पाटील यांचा वक्तव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा महायुतीतच चढाओढ सुरू असल्याचे बोलले जात आहे.
प्रत्येक पक्षाला स्वबळावर निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला त्याचा पक्ष वाढवायचा असतो. त्यासोबतच अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही. अशोक चव्हाण भाजपमध्ये नवीन आहेत. त्यांना युतीधर्माची माहिती खूप कमी आहे. युती धर्म म्हणून आम्ही भाजपसोबत काम केले आहे. भाजपच्या जुन्या मंडळींसोबत हातात हात घालून काम आम्ही केल्याचे हेमंत पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे येत्या काळात महायुतीमधील भाजप-शिवसेनेत मतभेद होण्याची शक्यता आहे.
महायुतीमधील तीन पक्षाने नुकत्याच झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत एक दिलाने काम केले त्याचा फायदा झाला होता. त्याच दृष्टीने आता येत्या काळात व्यापक विचार करून निर्णय घेतल्यास आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्याचा फायदा होणार आहे.
आगामी काळात महायुतीतील घटक पक्षच आमने-सामने येतील अशीच चिन्ह दिसत आहेत. शिर्डीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय आधिवेशन पार पडले. या अधिवेशनाला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री प्रफ्फुल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह ज्येष्ठ मंडळीने हजेरी लावली. यावेळी प्रफ्फुल पटेल यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काही महत्वाच्या टिप्स दिल्या. आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
या निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येकाला आपली ताकद दाखवण्याची संधी आहे. त्यामुळे आतापासूनच कामाला लागा. निवडणुकीची तयारी करा, त्यानंतर आपण महायुतीमध्ये एकत्रित लढायचे का ताकद असलेल्या ठिकाणी स्वबळ अजमावयाचे याचा निर्णय नंतर घेण्याचे संकेत त्यांनी अप्रत्यक्षरित्या कार्यकर्त्याना दिले होते. त्यामुळे येत्या काळात महायुतीमधील घटक पक्ष कोणता निर्णय घेणार याची उत्सुकता लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.