Pratap Sarnaik : परिवहन विभाग कर्नाटकाचा पॅटर्न राज्यात राबवणार का? मंत्री सरनाईक घेतायत माहिती

Karnataka transport model News : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेतला असून सरनाईक हे दोन दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. या ठिकाणच्या सुविधांची माहिती घेऊन लवकरच कर्नाटक परिवहन विभागाचा पॅटर्न महाराष्ट्रात राबविण्यात येण्याची शक्यता आहे.
Pratap Sarnaik
Pratap Sarnaik Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने चार दिवसापूर्वीच दरवाढ केली आहे. त्यामुळे प्रवासी व विरोधकाकडून टीका केली जात आहे. दर्जेदार सुविधा देण्यासोबतच आता येत्या काळात नाविन्यपूर्ण योजना आपल्या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होतील, यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेतला असून सरनाईक हे दोन दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. या ठिकाणच्या सुविधांची माहिती घेऊन लवकरच कर्नाटक परिवहन विभागाचा पॅटर्न महाराष्ट्रात राबविण्यात येण्याची शक्यता आहे.

पीएम नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सर्व लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना सांगितले होते की, इतर राज्यातील चांगल्या गोष्टींना भेट देऊन त्या आपल्या राज्यात कशा अमलात आणता येतील, याचा अभ्यास करा. जेणेकरून विविध ठिकाणच्या नाविन्यपूर्ण योजना आपल्या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होतील, असा त्यांचा या मागचा हेतू होता.

Pratap Sarnaik
Shivsena Politics : "शिवसेना जोडायची वेळ आली आहे..." ठाकरे-शिंदेंना एकत्र आणण्याचे शिंदेंच्या शिलेदाराने दिले संकेत

कर्नाटक राज्यातील परिवहन सेवा उत्तम असून याठिकाणी चालवण्यात येणाऱ्या ‘गरुडा’, ‘ऐरावत’, ‘अंबारी’ आदी लांबपल्ल्याच्या सेवा प्रवाशांना आवडत आहेत. त्यामुळे कर्नाटक परिवहन विभागाचा अभ्यास करण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Saranaik ) दोन दिवसाच्या कर्नाटकात दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे संपूर्ण माहिती घेतल्यानंतर येत्या काळात लवकरच कर्नाटक परिवहन विभागाचा पॅटर्न महाराष्ट्रात राबविण्यात येण्याची शक्यता आहे.

Pratap Sarnaik
Eknath Shinde On Budget : लक्ष्मीच्या पाऊलखुणा उमटल्या... : एकनाथ शिंदेंकडून मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाचे अभूतपूर्व स्वागत

सरनाईक यांची या दौऱ्यादरम्यान कर्नाटक राज्याचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्यासोबत बैठक होणार असून दोन्ही राज्यांच्या परिवहन सेवेसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. कर्नाटकमधील प्रादेशिक परिवहन व्यवस्थापनाचा अभ्यास करणे, त्याबरोबर कर्मचाऱ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या प्रोत्साहन योजना जाणून घेण्यासाठी या दौऱ्याची आखणी करण्यात आली असल्याचे समजते.

Pratap Sarnaik
Uddhav Thackeray : 'स्थानिक' साठी ठाकरे गटाची स्वबळाची तयारी; काँग्रेससह मित्रपक्षांचा सावध पवित्रा

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक शनिवारपासून कर्नाटकच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यात ते कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवेची माहिती घेणार आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, नितीन मैद व नंदकुमार कोलारकर हे अधिकारी आहेत.

Pratap Sarnaik
Shivsena News : आमचा पक्ष प्रवेश कधी होणार? 'त्या'माजी नगरसेवकांकडून नेत्यांकडे विचारणा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com