Raj Thackeray, sharad pawar, rahul gandhi, uddhav thackeray  Sarkarnama
विश्लेषण

Uddhav thackeray : उद्धव ठाकरे 'मविआ'च्या छावणीत की 'मनसे'च्या वाटेवर? नव्या समीकरणामुळे होणार कोंडी

Maharashtra politics News : राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संपूर्ण ताकदीने लढण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. त्यातच मनसे आणि काँग्रेसच्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यात आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच आता मुंबई महापालिका निवडणुकीत जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. एकीकडे महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेसने पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे मनसेसोबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने युतीबाबत बोलणी सुरु केली आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संपूर्ण ताकदीने लढण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. त्यातच मनसे आणि काँग्रेसच्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

मुंबई महापलिका निवडणुकीची भाजपने गेल्या काही दिवसापासून जोरदार तयारी केली आहे. याठिकाणच्या महापालिका ताब्यात घेण्यासाठी एकीकडे जोरदार तयारी केली आहे. त्यासाठी वेळप्रसंगी भाजपने (BJP) महायुती करण्याची रणनीती आखली आहे. तर दुसरीकडे राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संपूर्ण ताकदीने लढण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून शर्तीचे प्रयत्न केले जात असताना काँग्रेस व मनसेच्या भूमिकेमुळे त्यांची चांगलीच अडचण झाली आहे.

चार महिन्यापूर्वी मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू तब्बल 18 वर्षानंतर एकत्र आले. त्यानंतर प्रत्येक भाषणात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत जाण्याचे सूतोवाच दिले होते. पण आता राज ठाकरेंना मविआ घ्यायचे नाही, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) काँग्रेसलाही सोडायचे नाही अन् भावालाही सोबत घ्यायचे आहे, त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेला सामील करून घेण्यावरून काँग्रेसने स्पष्ट शब्दात नकार दिला, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आघाडी टिकवण्यासाठी आग्रही आहेत. जर राज ठाकरे तुमच्यासोबत असतील तर आम्ही तुमच्यासोबत येणार नाही, असे काँग्रेसने उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे.

काँग्रेस नेते वर्षा गायकवाड आणि रमेश चेन्निथला यांनी स्वबळाची घोषणा केल्याने ठाकरे गट नाराज झाला आहे. त्यांच्या मते, या घाईच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीचे नुकसान होऊन महायुतीला फायदा होईल. आघाडीतील ऐक्य टिकावे आणि मतांचे विभाजन टाळावे यासाठी उद्धव ठाकरे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. जागावाटपाची जबाबदारी असलेले नेतेही वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा करत आहेत.

उद्धव ठाकरेंना मुंबई आणि उपनगरासाठी राज ठाकरेंची साथ हवी आहे. पण काँग्रेसलाही सोडायचे नाही. तर दुसरीकडे काँग्रेस उद्धव ठाकरेंसोबत जायला तयार आहे, पण त्यांना राज ठाकरेंची साथ नको आहे. आशा स्थितीमध्ये उद्धव ठाकरे हे कात्रीत अडकले आहेत. महिन्याच्या आत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होईल. पण अद्याप महाविकास आघाडीचे चित्र स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत.

18 वर्षानंतर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे निवडणुकीत एकत्र येणार, यावर महाराष्ट्रातील जनतेने शिक्कामोर्तब केले. पण काँग्रेसने आघाडीत मनसे नकोच, अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरे कात्रीत अकडले आहेत. त्यांच्यासाठी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. उद्धव ठाकरे मविआसोबत की राज ठाकरेंसोबत निवडणुकीत उतरणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

त्यातच आता भाजपने केलेला अंतर्गत सर्व्हे समोर आला आहे. त्यानुसार भाजप 100 पुढे जागा जिंकत आहे. त्यामुळे त्यांना बहुमतासाठी केवळ 10 ते 15 जागा हव्या आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात लढताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कसरत करावी लागणार आहे. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा भाग राहिले आहेत, परंतु राज ठाकरे यांच्यासोबतच्या वाढत्या जवळीकतेच्या चर्चांमुळे आघाडीतील घटक पक्ष विशेषता काँग्रेसच्या भूमिकेमुळे निवडणुकीपूर्वी राजकीय कोंडी निर्माण झाली आहे. राज-उद्धव एकत्र येणार की उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्येच राहणार, यावर महाराष्ट्राच्या पुढील राजकारणाची दिशा अवलंबून असणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT