"INDIA bloc and NDA brace for a high-stakes Vice President election battle between CP Radhakrishnan and Sudarshan Reddy." Sarkarnama
विश्लेषण

Vice President Election update : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीची ‘स्ट्रॅटेजी’ झटका देणार? ‘NDA’कडून एक-एक मतासाठी फिल्डींग

INDIA Bloc Strategy in Vice President Election : एनडीएने प्रत्येक मतावर लक्ष केंद्रीत केले आहे. अधिकाधिक मताधिक्याने राधाकृष्णन यांचा विजय सुकर करण्याचा नेत्यांचा प्रयत्न आहे. मतदानासाठी लोकसभेचे 542 आणि राज्यसभेत 239 खासदार मतदार म्हणून पात्र आहेत.

Rajanand More

NDA’s Battle for Every Crucial Vote : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीए आणि इंडिया आघाडीकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. आज दोन्ही आघाड्यांवर बैठका आणि मॉक पोलचे आयोजन करण्यात आले होते. बहुतेक खासदारांनी त्याला हजेरी लावली. एनडीएकडे विजयासाठी पुरेसे संख्याबळ असले तरी इंडिया आघाडीनेही विजयासाठी कंबर कसली आहे. निवडणुकीत व्हीप नसल्याने सत्ताधारी पक्षातील खासदारही आघाडीच्या उमेदवाराला मतदान करतील, अशी स्ट्रॅटेजी आघाडीची आहे.

एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्ण आणि इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत होत आहे. दोन्ही उमेदवार दक्षिण भारतातील आहेत. रेड्डी यांना उमेदवारी देत इंडिया आघाडीने चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षासह के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाच्या खासदारांची कोंडी केल्याचे मानले जाते. या पक्षाचे काही खासदार रेड्डींना मतदान करतील, असा विश्वास आघाडीच्या नेत्यांना वाटत आहे.

एनडीएने प्रत्येक मतावर लक्ष केंद्रीत केले आहे. अधिकाधिक मताधिक्याने राधाकृष्णन यांचा विजय सुकर करण्याचा नेत्यांचा प्रयत्न आहे. मतदानासाठी लोकसभेचे 542 आणि राज्यसभेत 239 खासदार मतदार म्हणून पात्र आहेत. बीजेडी आणि बीआरएस या दोन पक्षांकडून मतदानात सहभाग घेतला जाणार नाही, याची दाट शक्यता आहे. त्यामुळे एकूण मतदारसंख्या 770 पर्यंत खाली येऊन बहुमताचा आकडा 386 असेल.

एनडीएचे 425 खासदार असून आंध्र प्रदेशातील जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. त्यांचे राज्यसभेत सात आणि लोकसभेत चार खासदार आहेत. त्यामुळे एनडीएची ताकद वाढल्याचे मानले जात आहे. मात्र, जगनमोहन यांनी इंडिया आघाडीच्या उमेदवाराची घोषणा होण्यापूर्वी हा पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे त्यांचे खासदारही फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्यातरी एनडीएकडे 436 चे संख्याबळ आहे. आपच्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल याही एनडीएकडे जाऊ शकतात.

लोकसभेत सात अपक्ष खासदारही असून त्यांची मते कुणाला मिळणार, याबाबत उत्सुकता आहे. अकाली दल आणि झेडपीएम या मिझोराममधील पक्षाचाही प्रत्येक एक खासदार आहे. त्यांच्या मतांबाबतही संभ्रम आहे. ही सर्व मते राधाकृष्णन यांना मिळाल्यास एनडीएचा आकडा 458 पर्यंत पोहचू शकतो. मात्र, जगदीप धनखड यांना मिळालेल्या 528 मतांपेक्षा हा आकडा खूप कमी आहे.

दुसरीकडे इंडिया आघाडीकडूनही विजयाचा दावा केला जात आहे. सुदर्शन रेड्डी हे कोणत्याही पक्षाचे नेते नाहीत. ते सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील काही खासदार रेड्डी यांना मते देतील, अशी आशा आघाडीला आहे. सध्यातरी आघाडीकडे 324 मते आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे. मात्र, आघाडीच्या सर्व खासदारांनी 100 टक्के रेड्डींना मतदान केले तरीही रेड्डी यांच्या विजयाची शक्यता धूसर आहे. एनडीए व आघाडीत नसलेल्या इतर पक्षांची जवळपास 60-70 अधिकची मते रेड्डी यांना मिळवावी लागणार आहेत. पण सद्यस्थितीत तशी शक्यता नाही.    

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT