Sharad Pawar- Lok Maje Sangati Part Two
Sharad Pawar- Lok Maje Sangati Part Two Sarkarnama
व्यक्ती विशेष

Sharad Pawar News : मे महिन्यात अनेक राजकीय गुपितं उलगडणार : पवारांच्या ‘लोक माझे सांगाती’ भाग दोनचे होणार प्रकाशन

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे आत्मचरित्र असलेल्या ‘लोक माझे सांगाती’चा (Lok Maje Sangati) भाग दोनचे लवकरच प्रकाशन होणार आहे. पहिल्या भागातील काही धक्क्यानंतर आता दुसऱ्या भागातही अनेक राजकीय गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. (Sharad Pawar's 'Lok Maje Sangati' Part Two will be published in May)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्या आत्मचरित्रावर आधारीत ‘लोक माझे सांगाती’ याचा पहिला भाग २०१५ मध्ये प्रसिद्ध झालेला आहे. त्या पुस्तकात अनेक राजकीय गुपिते आणि गौप्यस्फोट उघड झाली आहेत. त्याच पद्धतीने दुसऱ्या भागातही अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राला लोक माझे सांगातीच्या दुसऱ्या भागाची प्रतिक्षा आहे.

लोक माझे सांगातीचा भाग दोन हा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रकाशित होणार आहे. राज्यात २०१४ नंतर अनेक राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत. या २०१४ ते २०२३ पर्यंतचा काळाबाबत अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यात अनेक धक्कादायक खुलासे होणार? अशी चर्चाही रंगली आहे. विशेषतः विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर राज्यात अस्तित्वात आलेली महाविकास आघाडीबाबत अनेक गोष्टी प्रथमच उजेडात येण्याची शक्यता आहे.

तत्पूर्वी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या रहस्याची अनेकांना उत्सुकता आहे. तो शपथविधी कोणाच्या सांगण्यावरून झाला. त्याला शरद पवार यांची संमती होती का? की ती पवारांची खेळी होती. ज्याची चर्चा कायम महाराष्ट्रात होत असते. त्या सर्व बाबींचा खुलासा या दुसऱ्या भागात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोक माझे सांगतीच्या पहिल्या भागाचे प्रकाशन हे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी यांच्यासह देशभरातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत दिल्लीत झाले होते. आता दुसऱ्या भागाचे प्रकाशन कुठे आणि कोणाच्या हस्ते होणार, याचीही उत्सुकता असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT