
मुंबई : भाजपचे पुण्यातील आमदार सुनिल कांबळे यांची महापालिकेतील महिला अभियंत्याला फोनवरून शिवीगाळ करणारी ऑडिओ क्लिप रविवारी सकाळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर राष्ट्रवादीसह काँग्रेस, शिवसेना, मनसे या पक्षांच्या महिला नेत्यांनी कांबळे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं. आता भाजपत्या नेत्या चित्रा वाघ यांनीही या क्लिपवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
क्लिपबाबत सुनिल कांबळे यांच्याशी बोलणे झाल्याचे चित्रा वाघ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. त्या म्हणाल्या, अतिशय अभद्र भाषा आहे. कोणत्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधीच्या तोंडात न शोभणारी भाषा आहे. पण ही क्लिप कधीची आहे, आता कशी बाहेर आली, याची चौकशी व्हायला हवी. याबाबत मी आमदार सुनिल कांबळे यांच्याशी बोलले असून त्यांचा म्हणणं आहे की, हा आवात त्यांचा नाही. पण त्यांचा आवाज असेल नसेल, त्याचा शोध घेण्याची यंत्रणा आहे. ही क्लिप जेव्हा कधीची असेल, त्यावेळी का दखल घेतली नाही. सत्ताधारी पक्ष व विविध महिला पुढे येऊन सांगत आहेत, चित्राताई कुठे बसल्यात, त्यांची दातखीळ बसल्या का, पण असं नाही.
सत्ताधारी पक्षाचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांना एक कार्यकर्ता फोन करून सांगतो की, एका मुलीवर बलात्कार झालाय ती मदत मागत आहे. त्यांनी सांगितलं मरतेय तर मरूदे, ही भाषा वापरली गेली. यावर कोणंच काही बोलत नाही. पण भाजपचे आमदार म्हटले की लगेच टीका होते. मी त्या क्लिपमधील भाषेचे अजिबात समर्थन करत नाही. पण त्यांचं म्हणणं आहे की, तो आवाज त्यांचा नाही. त्यामुळे कुठल्याही पक्षाचे कुठलेही लोकप्रतिनिधी असले तरी त्यांनी आपली भाषा नीटच वापरायला हवी, असं वाघ म्हणाल्या.
सुनिल कांबळे ज्यांचा आवाज आहे किंवा नाही ती क्लिप आहे. पण निलेश लंकेंनी केलेल्या अभद्र शिवीगाळीची क्लिप नाही. मग त्याला योग्य म्हणायचे का? आता कुठेच काही मिळत नाही म्हणून जुन्या क्लिप काढायच्या. त्या असतील नसतील, त्यात एडिटिंग करायचं. ओढून-ताणून भाजपच्या कार्यकर्ते व नेत्यांवर आरोप करायचे. पण हे सगळं करून होणाऱ्या अत्याचारांवर बोलणार नाही असं वाटतं का? तुमची तर आम्ही सालटी काढू, असा निशाणा वाघ यांनी साधला.
अशा गोष्टींचा आधार घेत भाजपला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, याचा निषेध आहे. चित्रा वाघ, भाजपवर बोलायला सगळ्या पुढे येतात. त्यांची तर कीव येते. एवढ्या घटना होताना, तुमचा आवाज कुठे जातो. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण हाच जोर घडणाऱ्या घटनांसाठीही कायम ठेवा, त्याविरोधातही आवाज उठवा, असा टोला वाघ यांनी महाविकास आघाडीतील महिला नेत्यांना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.