आमदार काबळेंचा खुलासा; ‘ती’ क्लिप माझी नाहीच पोलीस तपासात सत्य समोर येईल

या संपूर्ण विषयाची कल्पना मी पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ तसेच प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांना दिली आहे.
MLA Sunil kamble
MLA Sunil kambleSarkarnama

पुणे : सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आलेली क्लिप माझी नाही. त्यात मोडतोड करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार करणार असून पोलिसांच्या तपासात सत्य बाहेर येईल,असा खुलासा भारतीय जनता पार्टीचे आमदार सुनील कांबळे यांनी आज केला.

या संदर्भातील वस्तुस्थिती पक्षाच्या वरिष्ठांच्या कानावर घातली असल्याचे आमदार कांबळे यांनी सांगितले. गेल्या पंचवीस वर्षापासून मी महापालिकेच्या राजकारणात आहे. एवढा प्रदीर्घ काळ नगरसेवक आहे. पक्षाने संधी दिल्याने मी गेल्यावेळक्ष आमदार झालो. निवडणुकीच्या राजकाणात माझा पराभव करता येत नसल्याने विरोधकांनी माझ्याविरोधात केलेले षढयंत्र असून पोलिसांच्या तपासात सत्य बाहेर येईल, असा कांबळे यांनी म्हटले आहे. क्लिपमध्ये कुणी मोडतोड केली. कुणी व्हायरल केली याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणीदेखील आमदार कांबळे यांनी केली.

MLA Sunil kamble
कांबळे, लायकी नाही तुमची लोकप्रतिनिधी व्हायची: रुपाली ठोंबरे- पाटील

या संदर्भात बोलताना आमदार कांबळे म्हणाले, ‘‘ या संपूर्ण विषयाची कल्पना मी पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ तसेच प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांना दिली आहे.विरोधकांनी माझ्याविरोधात केलेले हे कारस्थान असून निवडणुकीच्या राजकारणात मला हरवता येत नसल्याने या पद्धतीने बदनाम करण्यात येत असल्याचा दावा, आमदार कांबळे यांनी केला आहे.

पुणे महापालिकेतील एका महिला अभियंत्याला फोनवरून शिवीगाळ करणारी ध्वनिफित आज सकाळी सोशल मिडायीवार मोठ्याप्रमाणात व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसने आमदार कांबळे यांच्या घरासोमर आंदोलन केले. शिवसेना, महाराष्ट्र निवनिर्माण सेना,कॉंग्रेस या सर्व राजकीय पक्षांनी आमदार कांबळे यांचा निषेध केला. त्यामुळे सकाळपासून ‘स्विच ऑफ’ असलेला आमदार कांबळे यांचा फोन दुपारनंतर सुरू झाला आणि त्यांनी याबाबत खुलासा केला.

MLA Sunil kamble
...आणि आमदार सुनील कांबळेंचा फोन झाला ‘स्विच ऑफ’

आमदार कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. भाजपाने त्यांच्यावर कारवाई करावी यासह विवध मागण्या विरोधकांकडून करण्यात येत आहेत. संबंधित महिला आधिकाऱ्यांनी आमदार कांबळे यांच्याविरोधात तक्रार द्यावी, असे राष्ट्रवादीकडून त्यांना आवाहन करण्यात आले.या पाश्‍र्वभूमीवर ही क्लिपच मोडतोड करून बनवली असल्याचा खुलासा आमदार कांबळे यांनी केला आहे.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com