दोन कोटींची कार अन् एक हजार सुरक्षा कर्मचारी! नवीन मुख्यमंत्री म्हणाले, मला नको हा रूबाब!

चरणजितसिंग चन्नी यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतली आहे.
Charanjit Singh Channi
Charanjit Singh Channi File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी पंजाबच्या (Punjab) मुख्यमंत्रिपदाची (Chief Minister) धुरा हाती घेतली आहे. चन्नी यांच्या रुपाने पंजाबला पहिला दलित मुख्यमंत्री मिळाला आहे. साधेपणाने राहणाऱ्या चन्नी यांना मुख्यमंत्र्यांसाठी दोन कोटींची आलिशान कार आणि सुरक्षेसाठी 1 हजार कर्मचारी असल्याचे पाहून धक्काच बसला. त्यांना कैदेत असल्यासारखे वाटू लागले असून, याची मला गरज नाही, अशी जाहीर भूमिका त्यांनी घेतली आहे.

अतिशय साधेपणाने राहणारे आणि स्वत:ला आम आदमी म्हणवून घेणाऱ्या चन्नी यांना मुख्यमंत्रिपदाचा रूबाब आवडेनासा झाला आहे. मुख्यमंत्री म्हणून चन्नी यांना दोन कोटी रुपयांची आलिशान कार मिळाली आहे. याचबरोबर त्यांच्याभोवती 1 हजार सुरक्षा कर्मचाऱ्यांचे कडे आहे. यामुळे त्यांना आता कैदेत असल्याची भावना वाटू लागली आहे. या सगळ्या गोष्टींची गरज नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

मुख्यमंत्री चन्नी पोलिसांनी त्यांची सुरक्षा कमी करण्याची सूचना केली आहे. माझ्या सुरक्षेसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी नेमणे म्हणजे मनुष्यबळ वाया घालवण्याचा प्रकार आहे. माझ्या जिवाला कोणताही धोका नसून, मी एक सर्वसामान्य माणूस आहे. प्रत्येक पंजाबी नागरिक हा माझा भाऊ आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

चन्नी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली होती. ते म्हणाले होते की, यापुढे कृषीपंपांसाठी वीजबिल असणार नाही. याचबरोबर गरीब कुटुंबांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही. वीजपुरवठा खंडित झालेल्या असल्यास तो तातडीने जोडण्यात येईल आणि वीजबिल माफ केले जाईल. पंजाबची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, अशी मागणी मी केंद्र सरकारकडे करतो.

मी तळागाळातील वंचित घटक, रिक्षा ओढणारे आणि इतरांचा प्रतिनिधी आहे. गुन्हेगारी माफियांनी माझ्या कोणत्याही कामासाठी अजिबात येऊ नये, असा जाहीर इशाराही चन्नी यांनी दिला. माझे सहकारी असलेले उपमुख्यमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा आणि ओ.पी.सैनी हे दोघेही कार्यक्षम आहेत. त्यांच्यासोबत मी काम करीत राहीन, असेही चन्नी यांनी नमूद केले होते.

Charanjit Singh Channi
अमरिंदरसिंगांना सल्ला देणं मुख्यमंत्री गेहलोतांना पडलं महागात

मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांचा शपथविधी नुकताच झाला. चन्नी यांनी शपथ घेतल्यानंतर सुखजिंदरसिंग रंधावा आणि ओ.पी.सैनी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. चन्नी यांच्या रुपाने काँग्रेसला पंजाबमध्ये पहिला दलित मुख्यमंत्री मिळाला आहे. जातीय समीकरणे पाहून राहुल गांधींनी दोन उपमुख्यमंत्री देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने नाराज नेत्यांना खूष करण्याचा हा प्रयत्न होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com