Fact Check: ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताचे 250 जवान शहीद झाल्याचा दावा खरा की खोटा! लष्कप्रमुखांच्या 'त्या' व्हिडिओबाबत झाला महत्वाचा खुलासा

Fact Check: ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताचे 250 जवान शहीद झाल्याचा दावा करणारा लष्कर प्रमुखांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.
Upendra Dwivedi
Upendra Dwivedi Sarkaranama
Published on
Updated on

Fact Check Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताचे २५० जवान शहीद झाल्याचा दावा करणारा लष्कर प्रमुखांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. पत्रकार परिषदेत ते बोलत असतानाचा हा व्हिडिओ होता. या व्हिडिओची पडताळणी केल्यानंतर धक्कादायक खुलासा झाला आहे. सरकारच्या पीआयबी फॅक्टचेकच्या माध्यमातून या व्हिडिओची पडताळणी करण्यात आली आहे.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेची व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये हिंदीतून बोलताना जनरल द्विवेदी म्हणताना दिसतात की, "भारतीय लष्करानं शौर्याची परंपरा पुढे नेत ऑपरेशन सिंदूर दरम्यान देखील भारतीय सैन्यानं त्याच साहसाचं आणि दृढ संकल्पानं पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी ठिकाणांना निशाणा बनवलं. तसंच पाकिस्तानच्या आक्रमक कारवायांवर प्रभावशाली पद्धतीनं परतवून लावत एक निर्णायक विजय मिळवला. दरम्यान, एलओसीवर २५० भारतीय जवान शहीद झाले, तसंच लष्कराला मोठी हानी देखील सोसावी लागली. याचं कारण म्हणजे भारतीय उपकरणांवर पाकिस्तानी आणि चिनी उपकरणांद्वारे जवळून निगराणी केली जात होती"

Upendra Dwivedi
Amit Shah: नेहरुंच्या डोक्यावरही केस नव्हते मग....; अमित शहांनी सांगितला चीन युद्धावेळचा किस्सा

पण जनरल द्विवेदी यांच्या या व्हिडिओ क्लीपची तपासणी केल्यानंतर फॅक्टचेकमध्ये हे समोर आलं की, हा व्हिडिओ डिपफेक प्रकारचा व्हिडिओ आहे. म्हणजेच ओरिजिनल व्हिडिओमध्ये छेडछाड करत आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीनं प्रत्यक्ष ताबा रेषेवर भारताचे २५० जवान शहीद झाल्याचं सांगितलं गेलं आहे. मुळांत असा दावाच त्यांनी केलेला नाही, तर त्याऐवजी "आम्ही पाकिस्तानला शांतता राखण्याची संधी दिली पण त्यांनी आपला भेकडपणा दाखवून दिला" हे वाक्य जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी प्रत्यक्षात म्हटलं होतं. हे पीआयबीच्या फॅक्टचेकच्या टीमनं पुराव्यानिशी दाखवून दिलं आहे.

Upendra Dwivedi
Parinay Fuke taunt Nana Patole : 'नाना पटोले, तुम्ही बॅलेटवरही हरला, आता ग्राम पंचायतीकडे लक्ष द्या'; आमदार फुकेंनी टायमिंग साधलं

आपल्या या फॅक्टचेकमध्ये पीआयबीनं सांगितलं की, हा व्हिडिओ एआय जनरेटेड डिपफेक व्हिडिओ आहे. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी भारतीय जवान शहीद झाल्याचं कुठलंही विधान केलेलं नाही. लष्करप्रमुखांचा डिपफेक व्हिडिओ हा केवळ लोकांची दिशाभूल व्हावी आणि त्यांना चुकीची माहिती दिली जावी यासाठी तयार करण्यात आला आहे. त्यामुळं अशा पद्धतीचे डिपफेक व्हिडिओ जर तुमच्यासमोर आले तर ते सरकारी सुत्रांद्वारे कायम तपासून घ्यायला हवं, असं आवाहनही पीआयबीमार्फत करण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com