Boeing plane accidents : 6000 अपघात...9 हजार जणांचा मृत्यू; बोईंग विमानांमध्ये काय आहे चूक? पुन्हा प्रश्न उपस्थित

Boeing aircraft safety issues News : बोईंग विमाने कोसळण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही बोईंग विमाने अनेक वेळा कोसळली आहेत. याआधीही 2024 मध्ये दक्षिण कोरियामध्ये बोईंग विमान कोसळले होते. ज्यामध्ये 180 जणांचा मृत्यू झाला होता.
Thick black smoke rises from the crash site of Air India Flight AI‑171 after it went down near Ahmedabad airport shortly after takeoff.
Thick black smoke rises from the crash site of Air India Flight AI‑171 after it went down near Ahmedabad airport shortly after takeoff. Sakal
Published on
Updated on

Ahmedabad News : गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळले, ज्याचे थेट फोटो भयावह आहेत. या विमानात 242 लोक होते, ज्यात 12 क्रू मेंबर्स होते तर 230 प्रवासी प्रवास करीत असल्याचे समजते. एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार अहमदाबाद-लंडन गॅटविक या उड्डाण करणाऱ्या AI171 विमानाला 12 जून रोजी दुपारी 1.38 वाजता अपघात झाला.

एअर इंडिया विमान अपघातात बोईंगचे 787 ड्रीमलायनरचा सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. बोईंग विमान कोसळण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही असे अनेक प्रकार घडले आहेत. याआधीही बोईंग विमाने अनेक वेळा कोसळली आहेत. याआधीही 2024 मध्ये दक्षिण कोरियामध्ये बोईंग विमान कोसळले होते. ज्यामध्ये 180 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये बोईंगच्या 737-800 विमानांचा समावेश होता, जे 737 मॅक्सचे नवे व्हर्जन आहे.

Thick black smoke rises from the crash site of Air India Flight AI‑171 after it went down near Ahmedabad airport shortly after takeoff.
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अपघातग्रस्त विमानामध्ये माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी

2018 आणि 2019 मध्ये झाले होते अपघात

गेल्या वर्षी जानेवारीमध्ये एका वेगळ्या घटनेत, उड्डाणादरम्यान 737 मॅक्सच्या दरवाजाचा प्लग उडून गेला होता. याशिवाय, 2018 आणि 2019 मध्ये झालेल्या अपघातामध्ये लायन एअर फ्लाइट 610 आणि इथिओपियन एअरलाइन्स फ्लाइट 302 यांचा समावेश होता, ज्यामुळे बोईंग 777 ला त्यांचे विमान ग्राउंड करावे लागले आणि कंपनीला 30 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. 2018 आणि 2019 च्या अपघातांमध्ये अनुक्रमे 189 आणि 157 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तथापि, बोईंग 737-800 अजूनही कार्यरत आहेत.

Thick black smoke rises from the crash site of Air India Flight AI‑171 after it went down near Ahmedabad airport shortly after takeoff.
Air india Plane Crash : विमान अपघात नेमका कशामुळे हे सांगणार 'ब्लॅक बॉक्स' काय आहे?

बोईंग विमानांमध्ये काय चूक आहे?

जेव्हा बोईंग विमाने सतत क्रॅश होत होती, तेव्हा बोईंग 737 मॅक्सची चौकशी करण्यात आली होती. त्यामध्ये काही कारणे पुढे आली आहेत. या प्रणालीमुळे मॅन्युअल लँडिंगवरील अवलंबित्व कमी करण्यात आले होते. मात्र, त्याबद्दल वैमानिकांना फारशी माहिती देण्यात आली नाही. त्याचा परिणाम असा झाला की 2018 आणि 2019 मध्ये 346 प्रवासी आणि क्रू मेंबर्सना आपला जीव गमवावा लागला. या अपघातानंतर या विमानाचे ऑपरेशन बंद करण्यात आले. नंतर ते अपडेट करण्यात आले आणि त्यांनतर बोइंग 737-800 वापरात आणण्यात आले.

अहमदाबादमधील विमान अपघातात बोईंगचे 787 ड्रीमलायनरचा समावेश होता. या विमानाचा अपघात यापूर्वी घडलेला नाही. या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर या अपघाताचे नेमके कारण समजणार आहे.

Thick black smoke rises from the crash site of Air India Flight AI‑171 after it went down near Ahmedabad airport shortly after takeoff.
Ahmedabad plane crash : अहमदाबादमध्ये बोईंग 787 ड्रीमलायनरचा अपघात होणं धक्कादायक! पण का आहे हे विमान इतकं खास?

9000 हून अधिक जणांना गमवावे लागले प्राण

अहमदाबाद येथे घडलेल्या आपघातापूर्वी सरकारी आकडेवारीनुसार, जगभरात बोईंग विमानांचे जवळपास 6,000 अपघात आणि घटना घडल्या आहेत. त्यापैकी 415 अपघात हे प्राणघातक होते. त्यामध्ये 9,000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. जगभरात उड्डाण करणाऱ्या हजारो प्रवासी विमानांपैकी किमान 4000 पेक्षा जास्त बोईंग 737-800 आहेत. न्यू यॉर्क टाइम्सच्या एका अहवालात म्हटले आहे की आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिका हे काही प्रमुख खंड आहेत ज्याठिकाणी बोईंग विमाने वापरली जातात.

Thick black smoke rises from the crash site of Air India Flight AI‑171 after it went down near Ahmedabad airport shortly after takeoff.
Air india Plane Crash : विमान अपघात नेमका कशामुळे हे सांगणार 'ब्लॅक बॉक्स' काय आहे?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com