8th Pay Commission: अखेर प्रतीक्षा संपली? ८ व्या वेतन आयोगाबाबत नवीन नोटिफिकेशन जारी; कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट!

8th Pay Commission notification 2026 : 8व्या वेतन आयोगाबाबत नवीन अपडेट जाणून घ्या. केंद्र सरकारी कर्मचारी, वेतन, भत्ते, पेन्शन आणि आयोगाच्या सध्याच्या कामकाजाची महत्त्वाची माहिती येथे वाचा.
8th Pay Commission
8th Pay CommissionSarkarnama
Published on
Updated on

केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष सध्या 8th Pay Commission कडे लागले आहे. वेतन, भत्ते आणि इतर सेवासंबंधी बदलांबाबत आयोगाच्या शिफारशींची प्रतीक्षा केली जात आहे. दरम्यान, 8 व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या कामकाजासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध माहितीनुसार, मुंबई दौऱ्याबाबत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

8 व्या वेतन आयोगाचा मुंबई दौरा

आयोगाच्या माहितीनुसार, 22 आणि 23 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबईमध्ये बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. या दौऱ्यात विविध संघटना, संस्था तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांशी संबंधित संघ आणि युनियनच्या प्रतिनिधींशी आयोगाकडून चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यांशी संबंधित मागण्या मांडण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरू शकते.

8th Pay Commission
Cyber Attack on Congress : महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या नेत्याचे X अकाऊंट हॅक

कोणाला बैठकीत सहभागी होता येणार?

मुंबईमध्ये 8th Central Pay Commission सोबत चर्चा करू इच्छिणाऱ्या संघटना आणि संघांना ऑनलाइन प्रक्रियेद्वारे अपॉइंटमेंटसाठी विनंती करता येणार आहे. इच्छुक प्रतिनिधींनी 10 October 2026 किंवा त्यापूर्वी आपला अर्ज सादर करणे अपेक्षित आहे. यासोबतच मेमोरेंडम सादर केल्यानंतर मिळणारी 'Unique Memo ID' देणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर बैठकीचे ठिकाण आणि सविस्तर वेळापत्रक संबंधित प्रतिनिधींना आयोगाकडून कळवले जाईल.

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष

या चर्चेदरम्यान केंद्रीय कर्मचारी संघटना वेतन, भत्ते आणि सेवेशी संबंधित विविध मागण्या तसेच सूचना आयोगासमोर मांडू शकतात. यापूर्वीही आयोगाने विविध राज्यांमध्ये संघटना आणि प्रतिनिधींशी बैठका घेतल्या आहेत. आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर पुडुचेरी, चंदीगड आणि बेंगळुरू दौऱ्यांबाबतही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

8th Pay Commission
Cabinet Decisions : शेतकरी, म्हाडा अन् कृषी क्षेत्रासाठी फडणवीसांचा मास्टरप्लॅन! 5 मोठे निर्णय काय? वाचा एका क्लिकवर!

शिफारशी कधी येणार?

8 व्या केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना 3 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आली आहे. आयोगाला आपल्या शिफारशी सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे अंतिम अहवाल सादर करण्याची मुदत मे 2027 पर्यंत असण्याची अपेक्षा आहे. मात्र, शिफारशी कधी लागू होतील आणि वेतनात नेमका किती बदल होईल, याबाबत सध्या कोणतीही अंतिम घोषणा झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अधिकृत नोटिफिकेशन आणि आयोगाच्या पुढील घोषणांकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com