Kasaba By-Election : 'कसब्या'त आघाडीला मोठा दिलासा तर भाजपची धाकधूक वाढली; 'हे' आहे कारण

Mahavikas Aaghadi : विजयाचा मार्ग सुकर झाला असल्याची चर्चा
Kasba By Election
Kasba By Election Sarkarnama

Sambhaji Brigade News : कसबा पोटनिवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने आणि महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांच्यात थेट लढत होत आहे.परंतू, या निवडणुकीत बंडखोरांनी महाविकास आघाडीची धाकधाकू वाढविली होती.मात्र, आता कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. कारण या निवडणुकीतून संभाजी ब्रिगेड आणि आपनं माघार घेतली आहे.

कसबा पोटनिवडणुकी(Kasba By Election)त एकूण २१ उमेदवारांनी अर्ज वैध ठरले होते. त्यामुळे बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांचा भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फटका बसण्याची मोठी शक्यता निर्माण झाली होती. यात संभाजी ब्रिगेडने ठाकरे गटाशी युती असूनही निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार दिला होता. तसेच आपकडूनही या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. यामुळे आघाडीसमोर बंडखोरी रोखण्याचं आव्हान होतं.

मात्र, आता आधी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांनी माघार घेतली. आणि आता संभाजी ब्रिगेड(Sambhaji Brigade)सह आपनेही कसबा पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीसमोरील आव्हानं कमी झाली असून विजयाचा मार्ग सुकर झाला असल्याची चर्चा आहे.

Kasba By Election
Chinchwad By Election : ठाकरेंशी फोनवरुन चर्चा,राऊत- अहिरांकडून मनधरणी; तरीही कलाटेंकडून मविआची कोंडी...

संभाजी ब्रिगेडनी उमेदवारी अर्ज मागे घेतला...

संभाजी ब्रिगेड यांच्याकडून कसबा पेठ पोटनिवडणुकीत अविनाश मोहिते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने लालमहल येथे राजमाता जिजाऊंना अभिवादन करून प्रचाराचा नारळ देखील फोडण्यात आला आहे. पण आता संभाजी ब्रिगेडला ठाकरे गटाकडून निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती. या मागणीला यश आले असून मोहिते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

Kasba By Election
Maharashtra Politics : छत्रपती संभाजी महाराज नावाने ३४४ कोटींचा नवा विकास आराखडा तयार

कसबा पोटनिवडणूकीतून आपचीही माघार

आम आदमी पार्टीने महाराष्ट्रातील विधानसभा पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार किरण कद्रे यांनी कसबा विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे अशी घोषणा पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रीती शर्मा मेनन यांनी केली आहे. यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा व विधानसभांची निवडणूक पूर्ण ताकतीनिशी लढण्याचा निर्धार केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com