Delhi BJP Vs AAP : भाजपचा आम आदमी पार्टीला मोठा झटका; माजी मंत्री, आमदार, नगरसेवक लावले गळाला!

AAP leader Joins BJP News : दिल्लीतील भाजप कार्यालयात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत या नेत्यांचा प्रवेशसोहळा पार पडला; भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह अन्य नेत्यांबरोबर या सर्वांचे पक्षात स्वागत करण्यासाठी हजर होते.
Delhi BJP
Delhi BJPSarkarnama

Delhi BJP Politics News : छतरपूर विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पार्टीचे आमदार करतार सिंह तंवर, दिल्लीचे माजी मंत्री आणि पटेल नगरचे माजी आमदार राज कुमार आनंद आणि पटेल नगरच्या आणखी एक माजी आमदार वीना आनंद यांनी बुधवारी दिल्लीतील भाजप कार्यालयात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश प्रवेश केला.

दिल्ली भाजप(BJP) प्रमुख वीरेंद्र सचदेवा यांनी म्हटले की, दक्षिण दिल्लीतील सैद-उल-अजैब वॉर्डाचे आम आदमी पार्टीचे नगरसेवक उम्मेद सिंह फोगट आणि आप आदमी पार्टीच्या काही अन्य सदस्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह अन्य नेत्यांबरोबर या सर्वांचे पक्षात स्वागत करण्यासाठी हजर होते.

Delhi BJP
Rahul Gandhi Vs Ashwini Vaishnaw : मोदींचे ‘लोको पायलट’ राहुल गांधींवर बरसले; सगळंच खोडून काढलं...

याचबरोबर सचदेवा यांनी सांगितले की , आम आदमी पार्टीच्या(AAP) नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व आणि कामाने प्रेरित होत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आणि त्यांना वाटते की आम आदमी पार्टीत काम करणं म्हणजे हुकुमशाहीमध्ये काम करणयासारखं आहे. आम आदमी पार्टीमध्ये भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. सर्व नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि आम्ही सर्वांचे पक्षात स्वागत करतो आहोत.

Delhi BJP
Video Nitish Kumar : नितीश कुमारांचा पारा चढला; स्टेजवरच अधिकाऱ्याचे पाय धरण्यासाठी उठले अन्...

तंवर हे छतरपूर येथून दुसऱ्यांना आमदार झाले आहेत. त्यांनी 2015 मध्ये पहिल्यांदाच विजय मिळवला होता आणि 2020मध्ये आम आदमी पार्टीने त्यांना पुन्हा मैदानात उतरवलं होतं. 2014 मध्ये आम आदमी पार्टीत सहभागी होण्याआधी ते भाजपचे सदस्य होते आणि त्यांच्या पुन्हा भाजपात प्रवेशाला घर वापसी संबोधलं जात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com