Rahul Gandhi Vs Ashwini Vaishnaw : मोदींचे ‘लोको पायलट’ राहुल गांधींवर बरसले; सगळंच खोडून काढलं...

Railway Loco Pilot Issue Modi Government : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतीच दिल्लीत लोको पायलट म्हणजेच रेल्वे चालकांची भेट घेतली होती.
Rahul Gandhi, Ashwini Vaishnaw
Rahul Gandhi, Ashwini VaishnawSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : दिल्लीत लोको पायलट म्हणजेच रेल्वे चालकांची भेट घेत काँग्रेस नेते राहुल गांधींनी मोदी सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. या भेटीत लोको पायलट यांना चांगल्या सुविधा मिळत नाही, आठ तासांहून अधिक काम करावे लागते, असा दावा केला होता.

राहुल गांधींच्या भेटीनंतर भाजपनेही त्यांच्यावर पलटवार केला होता. तसेच रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनीही राहुल यांना भेटलेले लोको पायलट दिल्लीतील नसल्याचे सांगतिले होते. त्यावर लोको पायलट संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी लगेच पलटवार केला होता. त्यामुळे रेल्वेत हा मुद्दा चांगलाच तापला होता.

Rahul Gandhi, Ashwini Vaishnaw
Video Nitish Kumar : नितीश कुमारांचा पारा चढला; स्टेजवरच अधिकाऱ्याचे पाय धरण्यासाठी उठले अन्...

मोदी सरकारमध्ये मागील काही वर्षांपासून रेल्वेमंत्री असलेल्या अश्विनी वैष्णव यांनी अखेर काही दिवसानंतर राहुल यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हा तर मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न असल्याची टीका वैष्णव यांनी केली आहे.

काय म्हटले वैष्णव?

वैष्णव यांनी एक्सवर पोस्ट करत सर्व लोको पायलट रेल्वेच्या कुटुंबातील महत्वपूर्ण सदस्य असल्याचे म्हटले आहे. विरोधकांनी आमच्या लोको पायलट यांचा उत्साह कमी करण्यासाठी चुकीटी माहिती दिली जात आहे. लोको पायलटच्या कामांच्या तासांची काळजीपूर्वक रचना केली जाते. फेरी पूर्ण झाल्यानंतर त्यांना आरामाची व्यवस्था आहे. कामाच्या सरासरी तासांकडे बारकाईने लक्ष दिले जाते, असे वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे.

Rahul Gandhi, Ashwini Vaishnaw
IRS M Anusuya : सरकारचा ऐतिहासिक निर्णय; महिला IRS अधिकाऱ्याला लिंग व नाव बदलण्यास मान्यता

जून महिन्यात कामाचे तास सरासरी आठ तासांहून कमी आहेत. काही विशिष्ट कारणांमुळेच कामाचे तास वाढतात. लोको कॅब म्हणजे जिथून पायलट रेल्वे नियंत्रित करतात त्यांची स्थिती 2014 पर्यंत अत्यंत वाईट होती. 2014 नंतर त्यामध्य खूप सुधारणा करण्यात आल्या आहेत. सात हजारांहून अधिक लोको कॅबमध्ये एसी असल्याचेही वैष्णव यांनी सांगितले.

खोट्या बातमीतून रेल्वेच्या कुटुबांचे मनोबल खच्ची करण्याच्या विरोधकांच्या प्रयत्नांना यश मिळणार नाही. संपूर्ण रेल्वे परिवार देशाच्या सेवेसाठी एकत्र आहे, असेही वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे. वैष्णव यांच्या उत्तरानंतर आता लोका पायलट संघटना व काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येणार, याबाबत उत्सुकता आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com