अहमदाबाद : गुजरातमधील (Gujarat) चार महापालिका (Municipal Corporation) निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यातील गांधीनगर (GandhiNagar) महापालिकेत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. असे असले तरी राज्याच्या राजधानीतील या महापालिकेत आम आदमी पक्षाने (AAP) तब्बल 17 टक्के मते घेऊन भाजपला धोक्याचा इशारा दिला आहे. याचबरोबर पंचायत समितीच्या दोन जागांनी 'आप'ने जिंकल्या आहेत.
या वर्षांच्या सुरवातीला सुरत महापालिकेत आपने तब्बल 27 जागा जिंकून गुजरातमध्ये जोरदार एंट्री केली होती. यामुळे आता राज्यात झालेल्या 4 महापालिका निवडणुकांतील आपच्या कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. गांधीनगर महापालिकेत तिरंगी लढत झाली. भाजपने 44 पैकी 41 जागा जिंकून मोठा विजय मिळवला. काँग्रेसला 2 तर आपला एक जागा मिळाली. आपच्या उमेदवारांनी मते खाल्ल्याने काँग्रेस उमेदवारांना फटका बसला असून, पर्यायाने त्याचा फायदा भाजपला झाला आहे. भाजपच्या विजयालाच आपने हातभार लावल्याचे मानले जात आहे. परंतु, आपने 17 टक्के मते मिळवून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. ते कारणीभूत ठरली आहेत. आप आता राज्यात तिसरा प्रबळ पक्ष म्हणून अस्तित्व दाखवू लागला आहे.
भाजपने गांधीनगर महापालिकेत सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे. गांधीनगर महापालिका अस्तित्वात आल्यानंतर 2011 मध्ये काँग्रेसनं सत्ता काबीज केली होती. त्यानंतर 2016 मध्ये भाजप व काँग्रेसला प्रत्येकी 16 जागा मिळाल्या होत्या. यावेळी भाजपनं सत्ता हस्तगत केली. त्यानंतर यावर्षी झालेल्या निवडणुकीत भाजपनं ऐतिहासिक कामगिरी करत काँग्रेसचा पराभव केला. भाजपला पहिल्यांदा एवढ्या जागा मिळाल्या आहेत.
गुजरातमध्ये भाणवड, गांधीनगर, ओखा आणि थारा या महापालिकांची निवडणूक झाली होती. यापैकी भाणवड महापालिका काँग्रेसने खेचून आणली आहे. भाजपची 1995 पासून या महापालिकेत सत्ता होती. काँग्रसने 24 पैकी 16 जागा जिंकत भाजपचा पराभव केला. भाजपला केवळ आठ जागांवर समाधान मानावे लागले. भाजपने गांधीनगर, ओखा आणि थारा या महापालिकांतील सत्ता कायम राखली आहे. आम आदमी पक्षानेही या महापालिका निवणुकांत आपले अस्तित्व दाखवून दिले आहे.
ओखा महापालिका भाजपने आपल्या ताब्यात कायम ठेवली आहे. ओखा महापालिकेत भाजपने 36 पैकी 34 जागा जिंकल्या. येथे काँग्रेसला केवळ 2 जागा मिळाल्या. थारा महापालिकेतही भाजपने विजय मिळवला आहे. या महापालिकेत 24 पैकी 20 जागा जिंकत भाजपने सत्ता मिळवली असून, काँग्रेसला 4 जागा मिळाल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.