Arvind Kejriwal Vs BJP : दिल्लीची सत्ता गमावल्यानंतरही केजरीवालांनी दाखवला मनाचा मोठेपणा; जिंकलेल्या भाजपबद्दल केलं मोठं विधान

Arvind Kejriwal First Reaction On Delhi Assembly Election Results : आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावर शनिवारी(ता.8)दिल्लीतील निकालावर एक व्हिडिओ शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. केजरीवाल म्हणाले,दिल्ली निवडणुकीचे निकाल आज आले आहेत. जनतेचा निर्णय काहीही असो...
Narendra Modi, Arvind kejriwal
Narendra Modi, Arvind kejriwalSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र आता स्पष्ट झाला आहे. यात भाजपनं दिल्लीत जोरदार मुसंडी मारतानात आपला सर्वात मोठ्या पराभवाचा धक्का दिला. भाजप दिल्लीत प्रचंड बहुमतासह सत्तेत परतला आहे.आता दारुण पराभवानंतर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी सोशल मीडियावर शनिवारी (ता.8) दिल्लीतील निकालावर एक व्हिडिओ शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. केजरीवाल म्हणाले,दिल्ली निवडणुकीचे निकाल आज आले आहेत. जनतेचा निर्णय काहीही असो,आम्ही तो पूर्ण नम्रतेने मान्य करत आहोत. भाजपच्या विजयाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.

आम्ही सत्तेसाठी राजकारणात प्रवेश केलेला नसून,लोकांच्या सुख-दुःखात आम्ही नेहमीच त्यांच्यासोबत राहू.ज्या अपेक्षेने त्यांना बहुमत दिले आहे.त्या सर्व अपेक्षा ते पूर्ण करतील, अशी मला आशा आहे. आम्ही फक्त विरोधापक्षाचीच भूमिका निभावणार नाही,तर लोकांची सेवा देखील करणार आहोत. कारण आम्ही फक्त सत्तेसाठी राजकारणात आलो नसल्याचेही केजरीवाल यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात नमूद केलं आहे.

Narendra Modi, Arvind kejriwal
Chandrakant Patil News : दिल्लीत भाजपकडून 'आप'चा 'करेक्ट कार्यक्रम'; चंद्रकांत पाटलांचा काँग्रेसबाबत सर्वात मोठा दावा

केजरीवाल म्हणाले, गेल्या दहा वर्षांत जनतेने दिलेल्या संधीमध्ये आम्ही बरेच काम केले आहे. शिक्षण, आरोग्य, वीज आणि पाणी या क्षेत्रात बरेच काम झाले आहे. आम्ही वेगवेगळ्या प्रकारे लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्लीच्या पायाभूत सुविधा सुधारण्याचा प्रयत्न केला आहे.आम्ही सत्तेसाठी राजकारणात प्रवेश केलेला नसून, लोकांच्या सुख-दुःखात आम्ही नेहमीच त्यांच्यासोबत राहू, असेही केजरीवाल म्हणाले.

आम्ही राजकारणाला जनतेची सेवा करण्याचे माध्यम मानतो. आम्ही केवळ एका मजबूत विरोधी पक्षाची भूमिका बजावणार नाही तर समाजसेवाही करत राहू. आपल्याला अशा प्रकारे लोकांच्या सुखात आणि दुःखात मदत करण्यासाठी आम्ही तत्पर राहू अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली आहे.

Narendra Modi, Arvind kejriwal
Kolhapur District Shivsena President : उद्धवसेनेचे तीन शिलेदारांमध्ये जिल्हाध्यक्ष पदासाठी स्पर्धा, कोणावर राहणार ठाकरेंची मर्जी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमतासह सत्ता काबीज केल्यानंतर भाजपला आता राजधानी दिल्लीत अच्छे दिन आले आहेत. कारण दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध आप अशा अटीतटीच्या लढतीत भाजपनं (BJP) दमदार कामगिरी करत आपच्या हातातून सत्ता खेचून आणली आहे. नवी दिल्लीत भाजपने तब्बल 47 जागांवर मुसंडी मारली आहे. तर आम आदमी पक्षाला केवळ 23 जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे तब्बल 27 वर्षानंतर नवी दिल्लीत भाजपचे कमळ फुलले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आपचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांवर पराभवाची नामुष्की ओढावली. भाजपच्या परवेश वर्मा यांनी 3186 मतांनी केजरीवाल यांना पराभवाचा धक्का दिला. तर त्यानंतर मनीष सिसोदिया यांचाही 650 मतांनी पराभव झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com