Sanjay Singh ED Arrest : कोर्टात संजय सिंहांनी अदानींचा उल्लेख करताच न्यायाधीश म्हणाले, इथे भाषण देऊ नका...

Sanjay Singh ED Arrest Case : "कोर्टानं त्यांना असंबंधित विषयांवर बोलू नये, असे सुनावले. "
Sanjay Singh Ed Arrest
Sanjay Singh Ed Arrest Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Delhi News : कथित मद्य घोटाळ्यात अटकेत असलेले आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने संजय सिंह यांना 27 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुनावणीदरम्यान कोर्टात एक नाट्यमय प्रसंग घडला. संजय सिंह यांनी उद्योगपती गौतम अदानींच्या संदर्भात बोलायली सुरुवात केली, त्यावर कोर्टानं त्यांना असंबंधित विषयांवर बोलू नये, असे सुनावले. (Latest Marathi News)

Sanjay Singh Ed Arrest
Amanatullah Khan ED Raid : संजय सिंहांच्या अटकेनंतर 'आप'वर नवं संकट; आमदाराच्या घरावर ईडीची छापेमारी!

मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आप खासदार संजय सिंह यांना न्यायालयाने २७ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एम. के. नागपाल यांनी आता संजय सिंह यांना तीन दिवसांची कोठडी पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

संजय सिंह यांनी सुनावणीदरम्यान दावा केला की, ईडीकडे त्यांनी केलेल्या उद्योगपती अदानीविरुद्धच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केलेली नाही. गौतम अदानी यांचा उल्लेख संजय सिंह यांनी केला. त्यांनी अदानीसंबंधाने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. कोर्टाच्या आवारातही सिंह यांनी नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान नसून, अदानींचे पंतप्रधान आहेत, असे वादग्रस्त विधान केले होते.

Sanjay Singh Ed Arrest
NCP Ajit Pawar Group : अजित पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या सरचिटणीसपदी लतिफ तांबोळी यांची नियुक्ती

न्यायाधीश म्हणाले, 'कोणता दुसरा मुद्दा नाही का? जर तुम्हाला अदानी आणि मोदींवर इथे भाष्य करायचे असेल, तर मी तुम्हाला आतापासून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी करण्यास सांगेन. यावर संजय सिंहांनी दावा केला की, कोठडीमध्ये चौकशीदरम्यान ईडीकडून त्यांना संबंधित प्रश्न विचारले जात नाहीत. ते फक्त विचारतात की, मी माझ्या आईकडून पैसे का घेतले? मी माझ्या पत्नीला 10 हजार रुपये का पाठवले? ईडी तपास यंत्रणा नसून, करमणूक विभाग बनला आहे."

(Edited by - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.