Punjab Assembly elections : 'आप'कडून भाजप, काँग्रेसला धक्का; भगवंत मान यांना धुरीमधून उमेदवारी, जेलमध्ये असलेला नेताही यादीत...

AAP Punjab, Bhagwant Mann, AAP first list 2027, 40 candidates list : 'आप'ने २०२२ च्या निवडणुकीत ११७ पैकी तब्बल ९२ जागांवर विजय मिळवत राज्यात पहिल्यांदाच सत्ता काबीज केली होती.
Bhagwant Mann, Arvind Kejriwal
Bhagwant Mann, Arvind KejriwalSarkarnama
Published on: 
Updated on: 

AAP candidate list : पंजाबमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी भाजपसह काँग्रेसने कंबर कसली आहे. तर सत्ताधारी आम आदमी पक्षाने सत्ता कायम ठेवण्यासाठी आपली ताकद पणाला लावली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष कामाला लागलेले असताना आपने भाजप आणि काँग्रेसला धक्का दिला आहे. पक्षाने काही महिने आधीच ४० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

आपच्या पहिल्या उमेदवारी यादीत मुख्यमंत्री भगवंत मान यांना धुरी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. २०२२ च्या निवडणुकीत ते याच मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. यादीमध्ये मंत्री संजीव अरोरा यांचेही नाव आहे. सध्या ते एका प्रकरणात तुरुंगात असून त्यांना लुधियाना पश्चिममधून उमेदवारी देण्यात आली आहे.

पहिल्या यादीत ३७ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये काही मंत्र्‍यांचाही समावेश आहे. पंजाब विधानसभेच्या ११७ जागा आहेत. त्यापैकी ४० जागांवर उमेदवार जाहीर करत आपने विरोधकांवर सुरूवातीला मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांना आपल्या मतदारसंघात प्रचाराला मोठा कालावधी मिळणार आहे.

Bhagwant Mann, Arvind Kejriwal
National Conference rebellion : सत्ताधारी पक्षाच्या 24 आमदारांचे बंड? मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या स्वतंत्र बैठकीत रडारड, मुख्यमंत्री संकटात

'आप'ने २०२२ च्या निवडणुकीत ११७ पैकी तब्बल ९२ जागांवर विजय मिळवत राज्यात पहिल्यांदाच सत्ता काबीज केली होती. मतदारांनी या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेससह अकाली दल आणि भाजपलाही नाकारले होते. आपच्या लाटेसमोर सर्वच विरोधी पक्षांचा सुपडा साफ झाला होता. आता पुन्हा एकदा आपने मान यांच्या नेतृत्वाखाली सत्ता काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे.

Bhagwant Mann, Arvind Kejriwal
Sting operation news : काँग्रेसमधील मातब्बर नेत्याच्या स्टिंग ऑपरेशनने वादळ; महिला नेत्याची हकालपट्टी, आमदारकीसाठी ब्लॅकमेलिंग?

दरम्यान, विविध मतदारसंघातील सर्व्हे आणि लोकांकडून मिळालेल्या प्रतिसादानंतरच ४० उमेदवारांची नावे अंतिम करण्यात आल्याचे मान यांनी यापूर्वी सांगितले होते. त्यानुसार आज या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र, पहिल्या यादीत नाव न आलेल्या ५२ विद्यमान आमदारांचे टेन्शन आता वाढले आहे. त्यांना उमेदवारासाठी आता जोरदार फिल्डींग लावाली लागणार असल्याचे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.