Swati Maliwal News : हे मोठं षडयंत्र..! खासदार स्वाती मालीवाल यांच्या पूर्वाश्रमीच्या पतीचे गंभीर आरोप

Arvind Kejriwal News : अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्या पीएने मालीवाल गैरवर्तन केल्याचे समोर आले आहे. मंगळवारी आप नेत्यांनीही त्याची कबुली दिली आहे.
Swati Maliwal, Naveen Jaihind
Swati Maliwal, Naveen JaihindSarkarnama

New Delhi News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरूंगातून बाहेर आले अन् दोन दिवसांतच दुसऱ्याच वादात अडकले आहे. त्यांच्या निवासस्थानी त्यांच्याच खासगी सचिवाने पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल (Swati Maliwal News) यांच्याशी गैरवर्तन केल्याची घटन घडली आहे. त्यावरून विरोधकांकडून केजरीवालांवर चोहोबाजूने टीका होत आहे. त्यातच आता मालीवाल यांच्या पूर्वाश्रमीच्या पतीनेही या घटनेबाबत गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.

मालीवाल यांना सोमवारी केजरीवालांचे (Arvind Kejriwal) पीए बिभव कुमार यांनी मारहाण केल्याचा फोन दिल्ली पोलिसांना आल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. त्यावरून मालीवाल यांचे पूर्वाश्रमीचे पती नवीन जयहिंद यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात (Social Media) व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, चार वर्षांपुर्वीच आमचा घटस्फोट झाला आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत संपर्कात नाही. पण मालीवाल यांच्यासोबत घडलेला प्रकार एका षडयंत्राचा भाग असून त्यांच्या जीवाला धोका आहे, असा दावा जयहिंद (Naveen Jaihind) यांनी केला आहे. (Latest Political News)

Swati Maliwal, Naveen Jaihind
PM Narendra Modi : मी हिंदू-मुस्लिम करायला लागलो तर..! पंतप्रधान मोदींनी फेटाळले आरोप

जयहिंद यांनी फेसबुकवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, खासदार संजय सिंह (AAP MP Sanjay Singh) तुम्ही अ‍ॅक्टिंग का करत आहात? तुम्हाला सगळी घटना माहिती आहे. काय होणार आहे, हेही तुम्हाला माहिती होते. स्वातीवरील हल्ला एक षडयंत्र होते. तिचा जीव धोक्यात आहे. आता तुम्ही तिला धमकावण्याचा प्रयत्न करत आहात, असे आरोपही जयहिंद यांनी केले आहेत. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संजय सिंह हे मालीवाल यांच्याविरोधात षडयंत्र रचत असून त्यांनी तिच्याविषयी कसलीही सहानुभूती नाही. संजय सिंह यांनी आता अ‍ॅक्टिंग बंद करावी. कुणालाही न घाबरता स्वातीने पुढे येऊन आपल्यासोबत घडलेल्या घटनेविषयी बोलायला हवे. ही घटना अरविंद केजरीवाल यांच्या घरात घडल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल व्हायला हवा, असेही जयहिंद म्हणाले आहेत.

दरम्यान, संजय सिंह यांनी मंगळवारी मालीवाल यांच्याबाबत घडलेल्या प्रकाराबाबत दुजोरा दिला होता. केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांनी मालीवाल यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचे त्यांनी मान्य केले होते. केजरीवाल पीएवर कारवाई करणार, असल्याचेही संजय सिंह म्हणाले होते. आम आदमी पक्षातून या घटनेबाबत ही पहिलीच प्रतिक्रिया होती.

Swati Maliwal, Naveen Jaihind
Madhavi Raje Shinde Passes away : ज्योतिरादित्य शिंदे यांना मातृशोक; राजमाता माधवीराजे यांचे निधन!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com