Madhavi Raje Shinde Passes away : ज्योतिरादित्य शिंदे यांना मातृशोक; राजमाता माधवीराजे यांचे निधन!

Jyotiraditya Shinde Mother Madhavi Raje Shinde Passes Away : विवाहापूर्वी राजमाता माधवीराजे शिंदे यांचे नाव राजकुमारी किरण राजलक्ष्मी देवी होते.
Jyotiraditya Shinde Passes away
Jyotiraditya Shinde Passes away Sarkarnama

Madhya Pradesh News : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मातोश्रींचे निधन झाले आहे. राजमाता माधवीराजे शिंदे (Madhavi Raje Shinde) यांनी आज (दि.15 मे) सकाळी 9.28 वाजता दिल्लीतील एम्स हॉस्पिटल येथे अखेरचा श्वास घेतला. त्या 70 वर्षांच्या होत्या. मागील तीन महिन्यांपासून प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. उद्या गुरुवारी सकाळी 11 वाजता ग्वाल्हेर येथे अंत्यसंस्कार होणार आहे. (Latest Marathi News)

राजमाता माधवीराजे शिंदे या मूळच्या नेपाळच्या. त्या नेपाळच्या राजघराण्यातील होत्या. त्यांचे आजोबा जुद्द समशेर बहादूर नेपाळचे पंतप्रधान होते. ते राणा घराण्याचे प्रमुखही होते. 1966 मध्ये माधवराव शिंदे यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. मार्च 2020 मध्ये, जेव्हा शिंदे राजघराण्याचे प्रमुख ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत होते. त्यांच्या निर्णयात मुलगा आणि पत्नी त्यांच्यासोबत होते, पण त्यांची आई माधवी राजे शिंदे यांनी त्यांना पाठिंबा दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jyotiraditya Shinde Passes away
Sam Pitroda Profile In Marathi : मोदींच्या प्रत्येक भाषणात ज्यांचा उल्लेख ते सॅम पित्रोदा आहेत तरी कोण?

विवाहापूर्वी राजमाता माधवीराजे शिंदे यांचे नाव राजकुमारी किरण राजलक्ष्मी देवी होते. 1966 मध्ये ग्वाल्हेरच्या शिंदे राजघराण्यातील माधवराव शिंदे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. दिल्लीत मोठ्या थाटामाटात हे लग्न पार पडले. या शाही विवाहसोहळ्यात देश-विदेशातील पाहुणे उपस्थित होते.

Jyotiraditya Shinde Passes away
BJP MLA Krishna Khopde : आधी भावनिक केलं नंतर गंडवलं; भाजप आमदार खोपडेंबाबत नेमकं काय घडलं?

लग्नानंतर मराठी परंपरेनुसार नेपाळच्या राजकन्येचे नाव बदलण्यात आले. किरण राजलक्ष्मी हे नाव बदलून त्यांना माधवीराजे म्हटले जाऊ लागले. माधवीराजे आणि माधवराव यांच्यातील लग्नाचे नाते ग्वाल्हेरच्या राजघराण्यातील राणी माता विजयराजे शिंदे यांनी जुळवून आणले होते. माधवीराजे यांचे पती आणि माजी केंद्रीय मंत्री माधवराव शिंदे यांचे 30 सप्टेंबर 2001 रोजी निधन झाले. (Marathi News)

Jyotiraditya Shinde Passes away
BJP MLA Krishna Khopde : आधी भावनिक केलं नंतर गंडवलं; भाजप आमदार खोपडेंबाबत नेमकं काय घडलं?
Jyotiraditya Shinde Passes away
NCP Party Symbol Case : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाची सुनावणी आता जुलै महिन्यात !

माधवराव शिंदे यांच्या निधनानंतर माधवीराजे राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. 2004 च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या ग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, असे मानले जात होते. गुणातून ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) आणि ग्वाल्हेरमधून माधवीराजे रिंगणात उतरतील, अशी चर्चा होती. कारण त्यावेळी माधवरावांच्या आकस्मिक निधनामुळे लोक भावुक झाले होते, पण माधवीराजे यांनी स्वत:ला राजकारणापासून कायमच दूर ठेवले होते. तसेच माधवराव सिंधिया यांचा राजकीय वारसा मुलगा ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे सोपवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com