पक्षातून डच्चू मिळण्याआधीच प्रदेशाध्यक्ष रात्री 12 वाजता नड्डांच्या उपस्थितीत भाजपमध्ये!

भाजप आणि आम आदमी पक्षात आता जोरदार संघर्ष सुरू झाला आहे.
Anup Kesari with BJP leaders
Anup Kesari with BJP leaders Sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाने (AAP) पंजाबमधील दणदणीत विजयानंतर आता हिमाचल प्रदेशकडे लक्ष वळवले आहे. यामुळे सत्ताधारी भाजप विरुद्ध आप असा सामना राज्यात रंगला आहे. यातच आता आपच्या प्रदेशाध्यक्षांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्याने गदारोळ सुरू झाला आहे. या प्रदेशाध्यक्षांना आपमधून डच्चू मिळणार होता, त्याआधीच रात्री 12 वाजता त्यांनी भाजपमध्ये जाण्याची खेळी खेळली, असा दावा केला जात आहे.

आपचे प्रदेशाध्यक्ष अनुप केसरी आणि संघटन सचिव सतीश ठाकूर आणि उनाचे जिल्हाध्यक्ष इकबालसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. आता या सर्व प्रकरणात वेगळीच माहिती समोर येऊ लागली आहे. केसरी यांनी काही महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी आपने सुरू केली होती. त्यांची पक्षातून हकालपट्टी होण्याची चिन्हे होती. त्याआधीच केसरी यांनी भाजपमध्ये जाण्याचे पाऊल उचलले आहे.

Anup Kesari with BJP leaders
कोल्हापूरच्या मैदानात भोसरीच्या पैलवान आमदारांचा शड्डू!

याला आपचे नेते व दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीही दुजोरा दिला आहे. सिसोदिया म्हणाले की, भाजपने एका अशा व्यक्तीला पक्षात स्थान दिले आहे ज्याच्यावर महिलांशी गैरवर्तनाचा आरोप आहे. त्याच्या विरोधात आपकडे तक्रारीही आल्या होत्या. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी रात्री 12 वाजता या व्यक्तीला पक्षात प्रवेश दिला. आम्ही ज्या व्यक्तीची पक्षातून हकालपट्टी करणार होतो, अशा नेत्याला भाजपने गळाभेट दिली आहे.

Anup Kesari with BJP leaders
आमदार आवताडे दुसऱ्यांदा दानवेंच्या भेटीला पण 'ग्रीन सिग्नल' काही मिळेना!

हिमाचल प्रदेशमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा रोड शो झाला. यानंतर राज्यातील आपमध्ये मोठं वादळ उठलं आहे. केजरीवालांनी कार्यकर्त्यांचा अपमान केल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. यावरून गदारोळ सुरू असतानाच आपचे प्रदेशाध्यक्ष केसरी हेच आता भाजपच्या तंबूत दाखल झाले आहेत. यामुळे पंजाबनंतर हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या स्वप्नाला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com