आमदार आवताडे दुसऱ्यांदा दानवेंच्या भेटीला पण 'ग्रीन सिग्नल' काही मिळेना!

भाजपच्या आमदाराला आपल्याच पक्षाच्या केंद्रीय मंत्र्याकडे हेलपाटे मारावे लागत आहेत.
Raosaheb Danve and Samdhan Autade
Raosaheb Danve and Samdhan Autade Sarkarnama
Published on
Updated on

मंगळवेढा : पंढरपूर-विजयपूर या प्रलंबित रेल्वेमार्गासाठी भाजपचे (BJP) आमदार समाधान आवताडे (Samadhan Autade) यांचा पाठपुरावा सुरू आहे. यासाठी त्यांनी आठ महिन्यात दुसऱ्यांदा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची (Raosaheb Danve) नुकतीच भेट घेतली. परंतु. रेल्वे मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल मात्र अजूनही मिळत नसल्याचे चित्र आहे. भाजपच्याच आमदाराला आपल्याच पक्षाच्या केंद्रीय मंत्र्याकडे हेलपाटे मारावे लागत आहेत.

पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीनंतर ही जागा आता भाजपकडे आली आहे. स्थानिक आमदार, खासदार व केंद्रातील सरकार हे भाजपचे असल्याने रेल्वेचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा होती. यासाठी आमदार आवताडे यांनी 27 जुलै 2021 रोजी दिल्लीत रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती. यावर आठ महिन्यांत कोणतीही कार्यवाही झाली नाही. यामुळे पुन्हा आवताडे यांनी रेल्वेमंत्री दानवेंची भेट घेतली. या बैठकीत दानवेंनी लवकरच बैठक घेऊ, असे आश्वासन दिले आहे.

Raosaheb Danve and Samdhan Autade
भाजपचा केजरीवालांना दे धक्का! प्रदेशाध्यक्षांसह तीन बडे नेते फोडले

पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनासाठी कर्नाटकातून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे, विजयपूर ते पंढरपूर हे रेल्वे मार्गाने जोडल्यास या भागातील भाविकांची संख्या आणखी वाढणे शक्य आहे. भाविकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी रेल्वे फायदेशीर ठरणार आहे. हीच रेल्वे पंढरपुरातून पुढे लोणंदला जोडल्यास सोलापूर मार्गावरून उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वेचे सुमारे 61 किलोमीटरचे अंतर वाचवणार आहे. दिवंगत आमदार भारत भालके यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनाही याबाबत निवेदन दिले होते. परंतु. या रेल्वे मार्गाचा प्रश्न रखडलेलाच आहे.

Raosaheb Danve and Samdhan Autade
अमित शहांची मोठी घोषणा अन् पहिला विरोध भाजपशासित राज्यातूनच!

राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच पोटनिवडणुकीत पंढरपूरची जागा भाजपने राष्ट्रवादीकडून हिसकावून घेतली. भाजपने महाविकास आघाडी सरकारला त्यावेळी पहिलाच धक्का दिला होता. यामुळे ही पोटनिवडणूक आणि यात विजयी झालेले समाधान आवताडे चर्चेत आले होते. आता याच आवताडेना त्यांच्या मतदारसंघातील मागण्यांसाठी वारंवार पाठपुरावा करावा लागत आहे. आपल्याच केंद्रातील मंत्र्यांकडून त्यांना सहकार्य मिळत नसल्याचे दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com